‘इस्लामिक स्टेट’शी संबंधित मुंबईच्या युवकाची चौकशी

0
219

सिरीयात ‘इस्लामिक स्टेट’ सुन्नी दहशतद्यांशी लढताना मरण पावल्याचे समजले जात असलेला कल्याण-मुंबई येथील युवक आरिफ मजीद (२३) काल मुंबईत परतल्याचे कळल्यावर एनआयए व महाराष्ट्र एटीएसने त्याची कसून चौकशी केली. मे महिन्यात कल्याणचे अभियंते असलेले चार युवक दक्षिण आशियातील पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी गेले असता अचानक बेपत्ता झाले होते. त्यांनी आयएसआयएस दहशतवाद्यांबरोबर हातमिळवणी केल्याचे संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, चौकशीनंतर आरिफवर गुन्हा नोंदविण्यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे.