इराणात विमान कोसळून ४८ जण ठार

0
199

इराणची राजधानी तेहरानच्या पश्‍चिमी प्रांतात काल एक छोटे प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४८ जण ठार झाल्याचे वृत्त इराणच्या अधिकृत दूरचित्रवाणी वाहिनीने दिले आहे. सदर विमान तबास शहराच्या दिशेने जात असताना मेहराबाद विमानतळाजवळील भागात ते कोसळले. ठार झालेल्यांमध्ये पाच बालकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. गेल्या २५ वर्षात इराणमध्ये २००हून अधिक विमान अपघात झाले आहेत.