इनोव्हेशन काऊन्सिलच्या वेबसाइटचा शुभारंभ

0
88

गोवा राज्य इनोव्हेशन काऊन्सिलच्या वेबसाइटचा शुभारंभ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल करण्यात आला. राज्याचे माहिती तंत्रज्ञान धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यांनी याप्रसंगी बोलताना दिली.
या काऊन्सिलच्या वेबसाइटच्या माध्यमातून राज्यातील महाविद्यालयीन, विद्यापीठ विद्यार्थी, उद्योजक, गुंतवणूकदार यांच्यातील नवीन संकल्पना, उपक्रम, प्रतिभा, कौशल्य यांना उत्तेजन मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली.

या वेबसाइटच्या माध्यमातून स्थानिक बुद्धिमत्ता, संशोधक यांच्यासाठी नवीन संधी उपलब्ध करण्याचा उद्देश आहे. राज्य सरकारला नवीन संकल्पना चालना देण्यासाठी प्रोत्साहन देणे, राज्यातील गुणवंताचा शोध घेणे, चर्चासत्रे, व्याख्याने आणि कार्यशाळांचे आयोजन करणे, पोर्टल तयार करून नवीन संकल्पनांबाबत मार्गदर्शन आणि जागृती केली जाणार आहे.
राज्यातील नवीन उपक्रमांचा आराखडा तयार करण्याचे काम केले जाणार आहे, अशी माहिती काऊन्सिलचे अध्यक्ष जे. एम. नोरोन्हा यांनी दिली.