इटलीहून आणखी २७९ खलाशी दाखल

0
164

 

इटली मधून २७९ खलाशांना घेऊन खास चार्टर विमान शुक्रवारी पहाटे दाबोळी विमानतळावर दाखल झाले. यात २०६ गोमंतकीय तर ७३ महाराष्ट्रातील खलाशी होते.

रोम (इटली) येथे अडकून पडलेल्या २७९ खलाशांना घेऊन खास चार्टर विमान दाबोळी विमानतळावर उतरले. यात २०६ खलाशी गोमंतकीय तर उर्वरित ७६ खलाशी महाराष्ट्रातील आहेत. दाबोळी विमानतळावर विमानाचे आगमन होताच त्यांची चाचणी करून नंतर गोमंतकीय २०६ खलाशांना विलगीकरणासाठी मोरजी व कांदोळी येथे कदंब बसमधून पाठवण्यात आले. तर महाराष्ट्रातील ७३ खलाशांना कदंब बस मधून मुंबईला पाठवण्यात आले.

विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ
दरम्यान दुपारी प्रवाशांच्या विशेष तपासणी विभागात आरोग्य अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. प्रवासी सामाजिक अंतर न ठेवता तपासणीसाठी गर्दी करून उभे होते. नंतर अर्ध्या तासाच्या अंतरात संबंधित अधिकारी दाखल झाल्यानंतर प्रवाशांची तपासणी केली. मात्र तोपर्यंत दाबोळी विमानतळावर गोंधळ उडाला होता.