इंग्लंड विश्‍वविजेता!

0
91
England's captain Eoin Morgan lifts the World Cup trophy as England's players celebrate their win after the 2019 Cricket World Cup final between England and New Zealand at Lord's Cricket Ground in London on July 14, 2019. - England won the World Cup for the first time as they beat New Zealand in a Super Over after a nerve-shredding final ended in a tie at Lord's on Sunday. (Photo by Glyn KIRK / AFP) / RESTRICTED TO EDITORIAL USE

चौकार-षटकारांच्या निकषावर यजमान इंग्लंडने काल विश्‍वविजेतेपदाला गवसणी घातली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला देखील २४१ धावांपर्यंतच पोहोचता आले. निर्धारित षटकांत सामना बरोबरीत सुटल्याने निकालासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करावा लागला. या सुपर ओव्हरमध्येदेखील उभय संघांनी समान १५ धावा केल्याने सामन्यात सर्वाधिक चौकार-षटकार ठोकलेला इंग्लंडचा संघ नवीन विश्‍वविजेता ठरला.

केन विल्यमसनने मोडला माहेला जयवर्धनेचा विक्रम

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने सामन्यातील पहिली धाव घेताच नवीन विश्‍वविक्र’ाला गवसणी घातली. आयसीसी क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या एका आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणून त्याने आपले नाव विक्र’ांच्या पुस्तकात नोंदविले. २००७च्या विश्‍वचषकात श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार माहेला जयवर्धने (५४८ धावा) याचा विक्रम केनने मोडला. विल्यमसन व जयवर्धनेनंतर रिकी पॉंटिंग (२००७), ऍरोन फिंच (२०१९) व एबी डीव्हिलियर्स (२०१५) यांचा क्रमांक लागतो. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत ४६५ धावांसह सहाव्या स्थानी आहे. २००३च्या विश्‍वचषकात त्याने या धावा केल्या होत्या.

‘हिरो’ बनला ‘झिरो’
सलामीवीर मार्टिन गप्टिल याने २०१५ च्या विश्‍वचषक स्पर्धेतील ९ डावांत ६८.३७ च्या सरासरीने दोन शतकांसह ५४७ धावा चोपत संघाला फायनलचे द्वार उघडून दिले होते.परंतु चार वर्षानंतर इंग्लंडमधील विश्‍वचषकात संघातील इतर खेळाडू चमकत असताना गप्टिलची खराब कामगिरी नजरेत भरणारी ठरली. स्पर्धेतील १० डावात फलंदाजी करताना गप्टिलने १२.५५ च्या सरासरीने १८६ केवळ धावा केल्या. सलामीच्या लढतीत केलेली ७३ धावांची खेळी सोडल्यास पुढील ९ डावात फक्त ११३ धावा त्याच्या नावावर नोंद आहेत. वर्ल्डकपच्या १० डावात त्याने ७३ (नाबाद), २५, ०, ३५, ०, ५, २०, ८, १ आणि १९ अशा खेळी साकारल्या आहेत.

भारताच्या रोहितला
गोल्डन बॅट
टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्मा ‘गोल्डन बॅट’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. इंग्लंडचा ज्यो रुट व न्यूझीलंडचा केन विल्यमसन अंतिम सामन्यात अपयशी ठरल्यामुळे रोहितचा पुरस्कार निश्‍चित झाला. विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी रोहितच्या नावावर ९ सामन्यांतून ६४८ धावांची नोंद होती. रुटने १० लढतींतून ५४९ व विल्यमसनने ९ लढतींतून ५४८ धावा होत्या व ते अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी होती. दुसर्‍या स्थानावरील डेव्हिड वॉर्नर (६४७) व तिसर्‍यावरील शाकिब अल हसन (६०६) यांचे संघ अंतिम सामन्यात खेळत नसल्यामुळे केवळ रुट व विल्यमसनकडून रोहितला धोका होता. विल्यमसनने ३० व रुटने केवळ ७ धावा जमवल्याने रोहितचे पहिले स्थान निश्‍चित झाले.

इरासमस यांची मोठ्ठी चूक
क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत वादग्रस्त निर्णयांची मालिका अंतिम सामन्यातही सुरूच राहिली. अनुभवी असल्यामुळे फायनलमध्ये पंचगिरी करण्याचा मान मिळालेल्या मराय इरासमस यांच्या चुकीच्या निर्णयामुळे न्यूूझीलंडचा फलंदाज रॉस टेलर याला तंबूची वाट धरावी लागली. खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळत असताना टेलर सावधरित्या खेळत होता. ३० चेंडू खेळून १५ धावांवर असताना वूडने टाकलेला चेंडू टेलरच्या पायाच्या वरच्या भागाला लागला. चेंडू पायाला लागताच इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. पंचांनी हे अपील उचलून धरत टेलरला बाद ठरविले. बॉल ट्रॅकिंग प्रणालीमध्ये चेंडू यष्ट्यांच्या खूप वरून जात असल्याचे दिसून आले, पण सलामीवीर गप्टिलने रिव्ह्यू वाया घालवल्यामुळे त्यांच्याकडे रिव्ह्यू शिल्लक नव्हता.

षटकांत १४ चौकार व २ षटकार लगावले तर इंग्लंडने २२ चौकार व २ षटकार लगावले. या मोठ्या फरकामुळेच यजमानांना सुपर ओव्हरमधील बरोबरीदेखील विश्‍वविजेता बनविण्यास पुरेशी ठरली. यजमान इंग्लंडला यापूर्वी तीन वेळा विश्‍वविजेतेपदाने हुलकावणी दिली होती. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या पाच राष्ट्रांव्यतिरिक्त नवा जगज्जेता इंग्लंडच्या रुपात क्रिकेट जगताला काल मिळाला.

तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उभय संघांनी या सामन्यासाठी आपल्या संघात एकही बदल न करत उपांत्य फेरीत विजय मिळविलेलाच संघ कायम ठेवला. मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोल्स यांनी न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. संघाला भक्कम सलामी देण्यात ही जोडी पुन्हा एकदा कमी पडली. गप्टिल याचा खराब फॉर्म संघाला मारक ठरला. फलकावर केवळ २९ धावा लागलेल्या असताना गप्टिलने तंबूचा रस्ता धरला. वोक्सच्या गोलंदाजीवर वैयक्तिक १९ धावांवर पायचीत होऊनही त्यानेे संघाचा ‘रिव्ह्यू’ वाया घालवला.

यानंतर दुसर्‍या विकेटसाठी कर्णधार केन विल्यमनसन आणि हेन्री निकोल्स यांच्यात चांगली भागीदारी झाली. या द्वयीने संघाला शतकी वेस ओलांडून दिली.
ही दुकली न्यूझीलंडला भक्कम स्थितीत नेणार असे वाटत असताना लियाम प्लंकेटने विल्यमसनला वैयक्तिक ३० धावांवर बाद करत ही जोडी फोडली. निकोल्सने आपले नववे एकदिवसीय अर्धशतक झळकावत ५५ धावा जमवल्या. विल्यमसनच्या पतनानंतर तोदेखील फारवेळ टिकला नाही. त्यानंतर टेलर (१५) आणि नीशम (१९) झटपट बाद झाले. १७३ वर पाच बळी गेल्यानंतर लेथम आणि ग्रँडहोमने संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. हाणामारीच्या षटकात ग्रँडहोम १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर लेथमही अर्धशतकाच्याजवळ असताना ४७ धावांवर बाद झाला. अखेर ५० षटकात न्यूझीलंडचा संघ ८ बाद २४१ धावाच करू शकला.

धावफलक
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल पायचीत गो. वोक्स १९, हेन्री निकोल्स त्रि. गो. प्लंकेट ५५, केन विल्यमसन झे. बटलर गो. प्लंकेट ३०, रॉस टेलर पायचीत गो. वूड १५, टॉम लेथम झे. व्हिन्स गो. वोक्स ४७, जिमी नीशम झे. रुट गो. प्लंकेट १९, कॉलिन डी ग्रँडहोम झे. व्हिन्स गो. वोक्स १६, मिचेल सेंटनर नाबाद ५, मॅट हेन्री त्रि. गो.आर्चर ४, ट्रेंट बोल्ट नाबाद १, अवांतर ३०, एकूण ५० षटकांत ८ बाद २४१
गोलंदाजी ः ख्रिस वोक्स ९-०-३७-३, जोफ्रा आर्चर १०-०-४२-१, लियाम प्लंकेट १०-०-४२-३, मार्क वूड १०-१-४९-१, आदिल रशीद ८-०-३९-०, बेन स्टोक्स ३-०-२०-०

इंग्लंड ः जेसन रॉय झे. लेथम गो. हेन्री १७, जॉनी बॅअरस्टोव त्रि. गो. फर्ग्युसन ३६, ज्यो रुट झे. लेथम गो. ग्रँडहोम ७, ऑईन मॉर्गन झे. फर्ग्युसन गो. नीशम ९, बेन स्टोक्स नाबाद ८४ (९८ चेंडू, ५ चौकार, २ षटकार), जोस बटलर झे. साऊथी गो. फर्ग्युसन ५९, ख्रिस वोक्स झे. लेथम गो. फर्ग्युसन २, लियाम प्लंकेट झे. बोल्ट गो. नीशम १०, जोफ्रा आर्चर त्रि. गो. नीशम ०, आदिल रशीद धावबाद ०, मार्क वूड धावबाद ०, अवांतर १७, एकूण ५० षटकांत सर्वबाद २४१
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट १०-०-६७-०, मॅट हेन्री १०-२-४०-१, कॉलिन डी ग्रँडहोम १०-२-२५-१, लॉकी फर्ग्युसन १०-०-५०-३, जिमी