आशिया चषकाबाबत निर्णय लांबणीवर

0
181

ऑस्ट्रेलिया येथे ऑक्टोबर- नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेविषयी आयसीसीने आपला निर्णय जाहीर केल्यानंतरच आशिया चषक टी-ट्वेंटी स्पर्धेचा निर्णय घेण्याचे सोमवारी झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) ऑनलाईन बैठकीत निश्‍चित करण्यात आले.

आशिया चषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. स्पर्धेचे यावेळेस पाकिस्तानकडे आहे. परंतु, भारत पाकिस्तानात जाणार नसल्यामुळे त्रयस्थ ठिकाणी किंवा अन्य दुसर्‍या देशात ही स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

ही स्पर्धा स्थगित करण्यावरदेखील सोमवारच्या बैठकीत चर्चा झाली परंतु, अन्य तारखा व स्थळाबद्दल एकमत झाले नसल्याची माहिती आशिया क्रिकेट स्पर्धेचे परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. तसेच चीनमधील हांगझू येथे २०२२ साली होणार्‍या आशियाई स्पर्धेत एसीसीचा समावेश करण्याविषयी चर्चा करण्यात आली.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नझमूल हसन पेपोन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा हे देखील उपस्थित होते. मागील वेळी २०१८ साली ही स्पर्धा झाली होती. त्यावेळी अंतिम फेरीत भारताने बांगलादेशचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते.