आरोग्य खात्यातील कर्मचार्‍यांना एस्मा

0
124

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य खात्यामधील चतुर्थ श्रेणी (एमटीएस) कर्मचार्‍यांच्या नियोजित तीन दिवसीय संपाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचार्‍यांसाठी एस्मा लागू करण्यात आला आहे.

या संबंधीचा आदेश गृहखात्याचे अतिरिक्त सचिव अमरसेन राणे यांनी काल दि. ९ रोजी जारी केला आहे. या आदेशाद्वारे सरकारी इस्पितळ, दवाखान्यामधील कर्मचार्‍याच्या संपावर बंदी घालण्यात आली आहे.

आरोग्य खात्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍याच्या (एमटीएस) संपाच्या पार्श्‍वभूमीवर एस्मा लागू करून संपात सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांना कामावरून बडतर्फ करण्याचा इशारा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रपरिषदेत बोलताना दिला होता.
बांबोळीतील सरकारी इस्पितळात काम करणार्‍या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांच्या पूर्तीसाठी येत्या ११ ते १३ डिसेंबर दरम्यान संपाची नोटीस दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या इशार्‍याप्रमाणे कर्मचार्‍यांना संप करण्यास एका आदेशाद्वारे बंदी घालण्यात आली आहे. चतुर्थ श्रेणी कामगार वेतन आयोगानुसार मिळणारा पेशंट भत्ता मिळविण्यासाठी आंदोलन करीत आहेत, अशी माहिती गोवा मजदूर संघाचे नेते पुती गावकर यांनी दिली.