आयुर्वेद संजीवनी

0
1886

* घसा दुखतो आहे?
– दूध, हळद व साखर यांचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते. लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते.
* घसा खवखवणे –
बरेच वेळा घसा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतो. अशावेळी खडीसाखर आणि चिमूटभर काथ (विडे करताना घालतात तो) जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
खोकल्याची ढास येत असल्यास अख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. अथवा काथ व साखर मिश्रण चघळावे.
* कफ –
कफ झाला असल्यास विड्याची पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सुटून येतो.
* तोंड येणे, तोंडात पुरळ येणे –
तोंड येणे म्हणजे जीभ संवेदनशील होणे. तोंड येण्यामुळे जिभेवर फोड येतात. तसेच तिखट अजिबात जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते, अशा वेळी दोन दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक, सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत. तोंड येण्यामागे बिघडलेले पचन हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ कमी होण्यासही मदत होते.
* घशात जळजळ, घसा बसणे
वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळणे. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.
* पाय दुखणे
मध्यम वयाच्या महिला, अशक्त मुले आणि मुली ते सरसकट सगळे वृद्ध यांना पायदुखीचा त्रास बरेचदा होताना आपण पाहतो. यावर पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत, महिनाभर हा उपाय केल्याने पाय दुखणे थांबते.
* पोटदुखी
ओवा व साखर गरम पाण्याबरोबर घेण्याने पोटदुखी कमी होते. लहान बाळांमधील पोटदुखी पोट शेकण्यानेही कमी होते. अगदी तान्हे बाळ असेल तर आईने ओवा चावून बाळाच्या बेंबीवर तोंडानेच वाफारा सोडला तरी पोटदुखी कमी होते.
मात्र गॅसमुळे बाळाचे पोट दुखत असेल तर हिंग पाण्यात कालवून त्याचा लेप बेंबीभोवती दिल्याने आराम पडतो.
* चरबी कमी करा
– शरीरात जास्त चरबी वाढलेली असणार्‍यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.
साहित्य – १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जिरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.
कृती – वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.
– हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपर्‍यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.
फायदे – १. जुनाट वातविकार कायमचा जातो.
२. हाडे मजबूत होतात.
३. काम करण्यास स्फूर्ती येते.
४. डोळे तेजस्वी होतात.
५. केसांची वाढ होते.
६. जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.
७. रक्ताभिसरण चांगले होते.
८. कफप्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.
९. हृदयाची कार्यक्षमता वाढते.
१०. बहिरेपणा दूर होतो.
११. बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.
१२. ऍलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट मी होतो.
१३. दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.
१४. रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.
१५. नपुंसकता असेल तर ती दूर होते.
१६. ज्यांना मूल हवे असेल तर त्यांचे मूल तेजस्वी होते.
१७. मलेरिया, कावीळ, टायफॉइड, कॉलरा इ, रोगांना प्रतिकारशक्ती येते.
१८. त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणार्‍या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.
१९. स्त्रियांना तरुणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत होते.
२०. शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.
२१. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअटॅक येण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते.
२२. त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.
२३. कोणत्याही वयाची व्यक्ती स्त्री/पुरुष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे.