आयसिसचा मोर्चा आता अफगाणिस्तानकडे

0
103
  • शैलेंद्र देवळाणकर

इराक आणि सिरियामध्ये नाटो आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये हजारो योद्धे मारले गेल्यानंतर आयसिसने आता योद्ध्यांचा शोध सुरू केला असून त्यांनी आपला मोर्चा अङ्गगाणिस्तानकडे वळवला आहे. काबूलमध्ये झालेला ताजा बॉम्बस्ङ्गोट हे आयसिसयचे शक्तीप्रदर्शन आहे.

इराक आणि सीरियामध्ये इसिसच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आहे. मोसूलचा पाडाव झाला तेव्हापासून आयसिसच्या साम्राज्याची घसरण खर्‍या अर्थाने सुरू झाली. आजघडीला ही संघटना आखाती प्रदेशात निष्प्रभ झाली आहे. तेथून त्यांना योद्धे मिळणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत आयसिसने नव्या ठिकाणाचा शोध सुरु केला आणि त्याआधारे अङ्गगाणिस्तानात आपला तळ वसवायला सुरुवात केली आहे. थोडक्यात अङ्गगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या तीन इस्लामी देशांतून अधिकाधिक योद्धे मिळवणे हा उद्देश आहे, कारण या तीन देशांमध्ये धार्मिक मूलतत्ववादी संघटना सक्रिय आहेत. त्यामुळे इथे सहजपणे लोकांचे बुद्धिभेद कऱणे आणि आपल्या बाजूने वळवणे हे आयसिसला शक्य आहे. अङ्गगाणिस्तानची लोकसंख्या साडेतीन कोटी आहे आणि तेथे ४५ लाख शियापंथीय आहेत. या शिया पंथीयांचा नायनाट करणे हे आयसिसचे उद्दीष्ट आहे. म्हणूनच त्यांनी आपला डेरा अङ्गगाणिस्तानात बसवायला सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी अङ्गगाणिस्तानात मतदार नोंदणी शिबिरात मोठा बॉम्बस्ङ्गोट घडवण्यात आला होता; त्यानंतर ३० एप्रिलला काबूलमध्ये एका कारमध्ये आत्मघातकी बॉम्बचा स्ङ्गोट घडवून आणण्यात आला. यामध्ये काही पत्रकारांसह ३० लोक मृत्युमुखी पडले. अङ्गगाणिस्तानातील या बॉम्बस्ङ्गोटांमध्ये प्रामुख्याने आयसिसचा हात आहे. इस्लामिक स्टेटने अङ्गगाणिस्तानात पाय पसरायला सुरुवात केली आहे याचे हे निदर्शक आहे. याची सुरुवात २०१४ पासून झाली. २०१५ मध्ये अमेरिकेचे संपूर्ण सैन्य अङ्गगाणिस्तानातून माघारी गेले. त्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न काही संघटनांनी केला. आयसिस ही संघटना त्यापैकीच एक. अमेरिकेने जिथे मदर ऑङ्ग ऑल बॉम्ब डागला, त्या नंगरहार येथे आयसिसने आपले केंद्र बनवले. हा डोंगराळ भाग आहे. २००० ते २००५ दरम्यान ओसामा बिन लादेनही तिथे वास्तव्यास होता. तिथूनच आयसिसने अङ्गगाणिस्तानात हातपाय पसरायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना तालिबानमधून ङ्गुटलेले गट येऊन मिळाले. यामध्ये अङ्गगाणिस्तानात लोकशाही आल्यामुळे तालिबानच्या कार्यकारिणीवर नाराज झालेल्यांचा समावेश होता. मध्य आशियातील ङ्गर्गना खोर्‍यातून तयार झालेले अनेक धार्मिक मूलतत्ववादी किंवा ङ्गिदायीन दहशतवादी आयसिसला मिळाले आणि तेथील योद्धयांची संख्या २५०० वर गेली. त्यानंतर त्यांनी आपला प्रसार उत्तर अङ्गगाणिस्तानात करायला सुरुवात केली. आज आयसिसची या भागात जवळपास ५ हजार योद्ध्यांची ङ्गौज आहे. आयसिसचे हे वाढते प्रस्थ अमेरिकेला पटलेले नाही. नंगरहार हे आयसिसचे केंद्र असल्याची कल्पना अमेरिकेला असल्याने ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांनी तेथे बॉम्बहल्ला केला.

आयसिसला अङ्गगाणिस्तानात पाय पसरण्याची दोन उद्दिष्टे आहेत. मुळातच सर्वच जगात इस्लामिक सत्ता आणणे हे आयसिसचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यांच्या या संकल्पनेमध्ये मध्य आशिया, पश्‍चिम आशिया आणि दक्षिण आशियाचा काही भाग येतो. अङ्गगाणिस्तानचाही यामध्ये समावेश होतो. अङ्गगाणिस्तानातील आयसिसचा गट अबू बक्र अल बगदादीला मानणारा आहे. युरोपातील राष्ट्रांनी आयसिसविरोधी कडक पावले उचलायला सुरुवात केली तेव्हा त्यांना युरोपातून योद्धे मिळणे अवघड झाले. दुसरीकडे अमेरिका, नाटोने सीरिया आणि इराकमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये आयसिसचे हजारो योद्धे मारले गेले. त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांच्या शोधासाठी आयसिसला अङ्गगाणिस्तान ही पोषक भूमी वाटली. अङ्गगाणिस्तानच्या माध्यमातून पाकिस्तान आणि बांगलादेशातून योद्धे मिळवणे हे आयसिसचे दुसरे उद्दिष्ट होते. या दोन उद्दिष्टांसाठी आयसिसने अङ्गगाणिस्तानात तळ ठोकला.
आज अङ्गगाणिस्तानमध्ये ४० टक्के भागात तालिबानचे वर्चस्व आहे. तालिबानलाही अङ्गगाणिस्तानात धार्मिक मूलतत्ववादी शासनच प्रस्थापित करायचे आहे. मात्र या दोन्हींच्या भूमिकेत एक मूलभूत ङ्गरक आहे. आयसिसला राज्य नको आहे. त्यांना खलिङ्गा संस्कृती हवी आहे. आयसिसला राज्यांच्या सीमा पुसून टाकून एकच इस्लामिक राज्य करायचे आहे; तर तालिबानला धार्मिक मूलतत्ववादी शासन आणायचे आहे. दुसरे म्हणजे सद्यपरिस्थितीत या दोन्ही संघटनांतील संबंध शत्रुत्वाचे आहेत, कारण या दोन्ही संघटना आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबानचे असंतुष्ट कार्यकर्ते आयसिसला सामील झाले असले तरी त्यांना अल् कायदाचे समर्थन आहे. थोडक्यात, अङ्गगाणिस्तानात दहशतवादी संघटनांमध्ये धु्रवीकरण झाले असून त्यांच्यात संघटनेचा प्रभाव वाढवणे, योद्धे मिळवणे आणि अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. यामध्ये आयसिसचे पारडे वरचढ होताना दिसत आहे.

आता प्रश्‍न उरतो तो आयसिस आत्ताच का इतकी आक्रमक झाली आहे हा. याचे कारण येणार्‍या ऑक्टोबर महिन्यात अङ्गगाणिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि आयसिसला त्या होऊ द्यायच्या नाहीत. मात्र तालिबानची तशी भूमिका नाही, कारण अङ्गगाणिस्तानच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्षांनी तालिबानला चर्चेचे आमंत्रण दिले आहे. कोणत्याही अटींविना चर्चेची तयारी दाखवली आहे. त्यामुळे तालिबानचा प्रखरपणा कमी झाला आहे. त्यांनी निवडणुकांवर बहिष्कार घालायचे ठरवले आहे पण सामान्य माणसांचा बळी घेणार नाही आणि हिंसा करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच तालिबान आणि अङ्गगाणिस्तान सरकार यांच्यात चर्चा होणार आहे. नेमक्या याच गोष्टी आयसिसला नको आहेत. त्यांना निवडणुकाही नको आहेत आणि तालिबानची चर्चा घडायला नको आहेत. यासाठीच आयसिस अङ्गगाणिस्तानातील परिस्थिती अस्थिर बनवत आहे. यातून शासनामधील आणि तालिबानचे संबंध बिघडवण्याचा आयसिसचा डाव आहे.

समारोप करताना प्रश्‍न उरतो तो यावर उपाय काय? आखात किंवा पश्‍चिम आशियात अमेरिका आणि रशिया यांच्यात मतभेद आहेत. सीरिया आणि इराकमध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धामध्येही रशिया-अमेरिका आमने सामने उभ्या आहेत. मात्र अङ्गगाणिस्तानच्या बाबतीत अमेरिका आणि रशियाची एकवाक्यता आहे आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच येणार्‍या काळात डोनाल्ड ट्रम्प हे अङ्गगाणिस्तानासंदर्भात काय धोरण स्वीकारतात ह्यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. या सर्व महासत्तांनी सत्तेचे, हितसंबंधांचे राजकारण दूर ठेवत आयसिसचा समूळ नायनाट कऱणे गरजेचे आहे; अन्यथा इस्लामिक स्टेटला अङ्गगाणिस्तानात पाय रोवायला संधी मिळाल्यास ती धोक्याची घंटा ठरेल. मागील काळात तालीबानने अङ्गगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर हा देश दहशतवादाची निर्यात कऱणारा कारखाना झाला होता. आता आयसिसच्या कब्जानंतर तशी स्थिती पुन्हा उद्भवल्यास भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशांना याची जबर किंमत मोजावी लागेल. त्यामुळे आयसिसचा प्रसार न होऊ देणे याची काळजी अमेरिका, रशिया, चीन या देशांना घ्यावी लागेल.