आयपीएल; पंजाबचा मिलरला डच्चू; मुरली विजय नवा कर्णधार

0
92

इंडियन प्रिमियर लीगच्या विद्यमान पर्वातील सहा पैकी पाच सामन्यात हार पत्करावी लाल्याने किंग्ज इलेव्हन पंजाबने द. आफ्रिकन डेविड मिलरला कर्णधारपदावरून हटविले असून भारतीय कसोटी सलामीवीर मुरली विजयकडे संघनायकपदाची सुत्रे सोपविली आहेत.
गत पर्वात तळाला राहिलेला किंग्ज इलेव्हन संघ यंदाची गुणतक्त्यात खालल्या क्रमावरच असून त्याना अद्याप प्रतिष्ठेचे आयपीएल जेतेपद मिळविण्यात यश आलेले नाही.
आयपीएल २०१६मधील शेष प्रतियोगितेत मुरली विजय किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करील, अशी घोषणा फ्रँचाइजने पत्रकाद्वारे केली आहे.
कर्णधारपद म्हणून असफल ठरलेल्या मिलरचा फलंदाजीतही संघर्ष जारी असून गेल्या सहा सामन्यात त्याने केवळ ७५ धावा नोंदल्या आहेत. डेंविड मिलर अव्वल फलंदाज असून संघाचा अविभाज्य घटक म्हणून कायम असेल असेही निवेदनात नमूद आहे. पंजाबचा मुकाबला आज राजकोट येथे गुजरात लायन्सशी होईल. दि. ७, ९ आणि १५ मे रोजीचे आपले शेवटचे तीन सामने पंजाब स्वगृर्हंी, मोहालीत खेळेल, असेही घोषित करण्यात आले. हे तीन सामने नागपूरमध्ये खेळविण्यात येणार होते पण महाराष्ट्रातील तीव्र पाणी टंचाई आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर १ मे नंतरचे आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर हालविण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला असल्याने आता पंजाबचे शेवटचे तीन सामने मोहालीत होतील.