आयटी धोरणामुळे डिजिटल क्रांतीला चालना : मुख्यमंत्री

0
103

सरकारच्या माहिती तंत्रज्ञान धोरणामुळे राज्यात डिजिटल क्रांतीला चालना मिळणार आहे, असे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. गोवा राज्य नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणातून नवीन डिजिटल क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज झाले आहे. या धोरणामुळे डिजिटल पद्धतीला मोठी चालना मिळणार आहे. तसेच ई प्रशासन प्रणालीला आणखीन बळकटी मिळणार आहे. नवीन धोरणामुळे युवा वर्गाला रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत, असेही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हटले आहे.

नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली आहे. १५ जुलै रोजी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते माहिती तंत्रज्ञान धोरणाचा रीतसर शुभारंभ केला जाणार आहे.
यानिमित्त १४ व १५ जुलै रोजी पणजीत आयनॉक्सच्या आवारात दोन दिवसीय खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यातील आयटी उद्योजक तसेच या क्षेत्रात येऊ पाहणार्‍यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आयटी दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गुगल व ङ्गेसबुकद्वारे कौशल्य विकास कार्यशाळा घेतली जाईल. आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे.