आम्हाला कुणी समजून घ्या…

0
150
  •  प्रा. प्रदीप मसुरकर
    (मुख्याध्यापक स. हा. नामोशी-गिरी)

वर्गामध्ये ही इतर मुलांसारखीच बोलतात, खेळतात, तोंडी उत्तरे बरोबर देतात व ही मंदबुद्धीची नसतात. पण या मुलांचा गृहपाठ पूर्ण नसतो. शिकवताना अवधान कमी असते. कोणतेही काम कमी दर्जाचे (इन्फिरिअर क्वालिटी) असते. अक्षर गच्चाळ असते….

विशालची आई एक दिवस त्याच्या वर्गशिक्षिकेने बोलावणे पाठविल्यावरून त्याच्या शाळेत गेली. शाळेतील वर्गशिक्षिकेने त्याचे प्रगतिपुस्तक तिच्या हातात दिले. विशाल हा इयत्ता ३ रीत शिकणारा विद्यार्थी. प्रगतिपुस्तकावरून नजर फिरवताच ती चक्रावून गेली. तिचा आपल्या मुलावर विश्‍वासच बसेना, सगळ्या विषयात इतके कसे कमी गुण पडले? असा वर्गशिक्षिकेने प्रश्‍न केला? तेही १, ०, २… असे कसे झाले? असे विचारताच वर्गशिक्षिकेने विशालचे सगळे पेपर्स काढून दाखवले व ते पाहून आपण याच्याकडे लक्ष दिले नाही.. असे तिने कबूल केले.

बाईंनी पुन्हा सांगितले, ‘‘तो लिहिताना पेन्सील बरोबर धरत नाही, आकृती उलट काढतो – इंग्रजी बी उलटा, डब्लूच्या ऐवजी एम् लिहितो. लेफ्ट च्या ऐवजी फेल्ट असे लिहितो. त्याला सोमवार ते शनिवारपर्यंत क्रमवार वार सांगता येत नाहीत. सूचना पटकन लक्षात येत नाही. लिहावयास बघत नाही, गृहपाठ कधीच पूर्ण करून आणत नाही व त्यातही भरपूर चुका, अक्षर वाचता येत नाही… असे सांगताच विशालच्या आईचा चेहरा एकदम उतरला.

वरील गोष्टींचा विचार केल्यास शिक्षकांना वर्गात शिकवताना बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागते, हे लक्षात येते. वर्गात हुशार मुले, कमी ग्रहणशक्ती असलेली मुले आढळतात. विशाल हा दिसण्यास सर्वसामान्यासारखाच, खेळामध्ये हुशार, त्याचा बुद्ध्यांकही जास्त म्हणजे इतर सामान्य मुलांपेक्षा जास्त, असे असूनही तो लिहिताना, वाचताना स्पेलिंग सांगताना व उच्चारताना चुका करतो. हासुद्धा एक अध्ययन-दोष आहे. याला एस.एल.डी.- स्पेसिफिक लर्निंग डिसऍबिलिटीज – विशिष्ट अध्ययन दोष असे म्हणतात.
तर प्रश्‍न पडतो हा दोष कशामुळे होतो? विशिष्ट (खास) अध्ययन दोष हा मेंदूच्या आकारामुळे होतो. इंग्रजीमध्ये याला ‘न्युरॉलॉजिकल डिसफन्क्शन’ असे म्हणतात. मानवाचा मेंदू म्हणजे ब्रेन हा मुख्य दोन भागांमध्ये विभागला आहे. त्यास इंग्रजीमध्ये हेमिस्फिअर्स असे म्हणतात. ‘राईट हेमिस्फिअर’- उजवीकडील अर्धा भाग आणि ‘लेफ्ट हेमि.’- डावीकडील अर्धा भाग- असे दोन भाग असतात. सर्वसामान्य मुलांमध्ये डाव्या बाजूकडील अर्धा भाग हा उजव्या बाजूच्या अर्ध्या भागापेक्षा आकाराने मोठा असतो. पण मेंदूचे हे दोन्ही भाग सारख्याच आकाराचे असतील तर ‘(विशिष्ट अध्ययन दोष उद्भवतो. सर्वसामान्यपणे वर्गात ५ टक्के मुलांमध्ये अशा प्रकारचा दोष दिसून येतो. नेमके काय होते व याची लक्षणे कोणती? अशा मुलांना कसे ओळकायचे ते पाहू.

पूर्वप्राथमिक स्तरावर दिसणारी लक्षणे –
(वॉर्निंग साइन्स ऑफ एस.एल.डी.) –
* मूल उशिरा बोलते.
* उच्चार करताना अडखळते.
* शब्दसंचय वाढ सावकाश होते.
* अशा मुलांना क्रम लक्षात राहात नाही. उदा. आठवड्याचे दिवस सांगताना चुकतात. मुळाक्षरांचा क्रम सांगताना चुकतात.
* अशा मुलांचे अवधान कमी असलेले दिसून येते व अस्थिर असतात.
* शिक्षकाच्या सूचना पाळण्यास व समजून घेण्यास कठीण जाते.
प्राथमिक स्तरावर दिसणारी लक्षणे ः
* अशा मुलांना काही शब्द, आकृती इतरांपेक्षा वेगळ्या रीतीने जाणवतात. ‘वॉज- ुरी’च्या ऐवजी ‘सॉ-ीरु’ असे लिहितात. ‘बबन’च्या ऐवजी ‘नबब’ असे लिहितात.
* अक्षरांची अदलाबदल करतात. ‘ल’च्या ऐवजी ‘व’ असे काढतात.
* काही अक्षरे उलट लिहितात. ‘ा’च्या ऐवजी ‘ु’ असे हिहितात.
* काही शब्दांमध्ये बदल दिसून येतो. क्रम बदलतात. ‘षशश्रीं’च्या ऐवजी ‘श्रशषीं’ असे लिहितात.
* वाचताना आपले स्वतःचे शब्द घालून वाचतात. ‘र्हेीीश’च्या ऐवजी ‘हेाश’ असे संबोधतात.
* गणित करताना चिन्हे वापरण्यामध्ये गोंधळ दिसून येतो.
* आकृती काढून घेताना ती फिरलेली आढळते.
* कोणतेही कौशल्य शिकण्यास वेळ लागतो.
* काही घटना किंवा क्रम सांगण्यास वेळ लागतो किंवा चुकतो.
* पेन्सील धरण्याची ढब (ग्रिप) वेगळीच (अस्थिर) दिसून येते.
* गृहपाठ पूर्ण कधीच नसतो.
कसे ओळखाल? ः-
* वर्गामध्ये ही इतर मुलांसारखीच बोलतात, खेळतात, तोंडी उत्तरे बरोबर देतात व ही मंदबुद्धीची नसतात. पण या मुलांचा गृहपाठ पूर्ण नसतो. शिकवताना अवधान कमी असते. कोणतेही काम कमी दर्जाचे (इन्फिरिअर क्वालिटी) असते. अक्षर गच्चाळ असते. लिहिताना जोर देऊन लिहितात, दोन ओळीत अंतर ठेवून लिहीत नाहीत. त्यांची वही शिक्षकाच्या लाल शाईने रंगलेली असते. वाचताना जोर देऊन वाचतात. आपले शब्द घालून वाचतात. स्पेलिंग्ज सांगताना, उच्चार करताना चुका करतात व पालकांकडे सतत तक्रारी असतात. अशा अशा मुलांना हाताळावे कसे? असा शिक्षकांना प्रश्‍न पडतो.

काही शिक्षकांची व पालकांची- ही मंदबुद्धीची मुले आहेत- अशी कल्पना होते. ‘वेळेवर लक्ष पुरविले नाही तर सतत मागे पडतात व शाळा सोडण्याची शक्यता असते. अशा मुलांना पुन्हा पुन्हा ओरडून घ्यावे लागते. काही शिक्षक अशा मुलांना समजून न घेतल्याने शिक्षा करतात व त्यामुळे अशा मुलांच्या स्वतःच्या जाणिवेवर परिणाम होऊ शकतो. हा सगळा दोष मेंदूच्या दोन भागांच्या सारख्या आकारामुळे होतो. त्याप्रमाणे त्यांना तशी अक्षरे, आकृती जाणवते. मग त्यांचा काय दोष?
अशा मुलांसाठी शिक्षकांनी घ्यावयाची काळजी…
* अशा मुलांना वर्गात पुढे आणून बसवा.
* सूचना वाचताना मोठ्याने, सावकाश व स्पष्ट असाव्या.
* अशी काही मुले इतर कौशल्यास बरी असतात. त्यांचे सुप्त गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन द्या.
योग्य प्रबलनांचा वापर करा…
* पालकांशी नियमितपणे संपर्क ठेवा.
* फळ्यावरील मुद्दे लिहून घेताना थोडा जास्त वेळ द्या.
* तोंडी उत्तरे बरोबर देत असल्यास त्याला त्याप्रमाणे प्रोत्साहन द्या.
* लाल शाईच्या पेनाचा वापर अशा मुलाच्या वह्या तपासण्यासाठी करू नका.
* कोणता शब्द चुकतो, उच्चारताना कोठे चुका करतो ते पाहून सराव द्या. अशी मुले १ः१ सरावास योग्य प्रतिसाद देतात.
* वर्गात शिकवताना जास्तीत जास्त ज्ञानेंद्रियांचा वापर कसा होईल याकडे लक्ष देऊन याचा विचार करून त्यांचा सहभाग करून शिकवा.
* फोनाटीकसचा वापर करून शिकवता येते. अशा मुलांची ऐकण्याची, पाहण्याची व स्पर्शज्ञान यापैकी कोणती कुवत जास्त आहे हे शिक्षकाच्या लक्षात येईल. त्याप्रमाणे सराव दिल्यास अशी मुले ही पुढे येऊ शकतील व अशा मुलांनाही न्याय देण्याचा आपल्या परीने प्रयत्न करू या.

अशा प्रकारचा अध्ययन दोष किंवा अध्ययन घेताना अडचणी दिसून आल्यास पालकांनी थोडा पुढाकार घेऊन त्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून पत्र घेऊन संस्थेच्या सायकियाट्री अँड ह्युमन बिहेवियर’कडे जाऊन अध्ययन दोष कोणत्या प्रकारचा आहे ते पहावे व त्यांच्याकडून सर्टीफिकेट मिळवल्यानंतर त्या विद्यार्थ्यास खास विषय निवडण्याची व घेण्याची सोय शासनाने केली आहे. काही शाळेत असा मुलांना शिकवण्यासाठी रिसोर्स रूमची निर्मिती केली आहे व त्यासाठी त्यांना शिकवण्यासाठी स्पेशल एज्युकेटरची तरतूदही केली आहे. गोवा शालांत मंडळाने बर्‍याचशा सुविधा अशा मुलांसाठी दिल्या आहेत. आता पालक म्हणून व शिक्षक म्हणून कर्तव्य कोणते…
– कोणत्या प्रकारचा अध्ययन दोष आहे हे शोधून काढणे,
– वाचन करताना अडचणी येणे – डिस्फ्लेक्सिया तर लिखाणात – डिस्ग्राफिया की संख्या समजत नाहीत, गणीतीय संकल्पनेमध्ये गोंधळ होतो- डिसकॅल्क्लिया. व इतर आणखी आपल्या पाहण्यात आल्या असतील तर त्याप्रमाणे पालकांनी व शिक्षकांनी अशा मुलांना पुढे आणण्याचा प्रयत्न करावा. काही जणांचा बुद्ध्यांक चांगला असतो पण असा अध्ययन दोष असल्यामुळे ती मागे पडतात. पण त्यांचा परफॉर्मन्स, आय.क्यू. फार छान दिसून येतो. त्यांची असेसमेंट परफॉर्मन्स बेस /ऍक्टिव्हिटी बेस घेतल्यास अशा मुलांचा आत्मविश्‍वास वाढेल व ती कोठेही कमी पडणार नाहीत.
गेल्या वर्षी एसएससी परीक्षांत ७५% गुण मिळवून विद्यार्थी पास झाला. त्यास लिखाण करण्यास अडचण भासत होती. तो आता आय.टी.आय. ऍग्रीकल्चर करतो आहे.
शिक्षणाचे मुख्य उद्देश मुलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करणे हे आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा ‘युनिक’ असतो. वैयक्तिक मतभेद असतात हे समजून घेणे आवश्यक असते. प्रत्येक मुलात विशेष अशी कार्यक्षमता असते. आपण प्रोत्साहन दिले पाहिजे.
* थोर शास्त्रज्ञ थॉमस एडिसन ज्याने विविध विद्युत उपकरणांचा शोध लावला.
* शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन
* स्टिफन हॉकिन्स – एक उत्कृष्ट फिजिसिस्ट. अध्ययन करत असतानासुद्धा नवीन शोध लावले. ही अशी काही उदाहरणे आहेत.
तर आम्ही आमच्या मुलांना चांगल्या तर्‍हेने समजून घेऊया.