आमदार अपात्र याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

0
257

कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांविरुद्ध प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्य विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे अपात्रतेची जी याचिका दाखल केलेली आहे, त्यासंबंधीची सुनावणी काल सर्वोच्च न्यायालयात झाली असता न्यायालयाने ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलली.

कालच्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
प्रतिवादी आमदारांचे वकील रोहतगी यांनी यावेळी आमदारांना ई-मेल केलेल्या नोटीसा मिळू शकल्या नसल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने या दहाही आमदारांना पुन्हा नोटीसा मेल करण्याचा आदेश अर्जदाराला दिला. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आमदारांना उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.