आपल्या नातेवाईकांचा अमेरिका दौरा स्वखर्चाने : पर्यटनमंत्री

0
64

गोवा पर्यटन खात्याच्या शिष्टमंडळाबरोबर आपल्या कुटुंबातील जे सदस्य अमेरिकेला गेले होते ते स्वखर्चाने गेल होते असा खुलासा पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल केला.

पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा पर्यटन खात्याचे एक शिष्टमंडळ हल्लीच अमेरिकेला गोवा पर्यटनासंबंधीचा एक रोड शो करण्यासाठी गेले होते. या शिष्टमंडळात आजगावकर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा समावेश असल्याने कॉंग्रेस पक्षाने त्याला आक्षेप घेत आजगावकर यांचे कुटुंबीय सरकारी खर्चाने अमेरिकेत गेल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यासंबंधी आजगावकर यांना काल पत्रकारांनी छेडले असता आपल्या कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या आरोपांबाबत वरील स्पष्टीकरण दिले.