आपत्कालीन परिस्थितीतील सज्जतेसाठी…

0
110
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

विमान हल्ल्यात विमानतळ नष्ट झाले, तर आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ विमाने उतरवण्याचा सराव असावा यासाठी लखनौ-आग्रा एक्सप्रेस वेवरील चार किलोमीटर भागात २० लढाऊ विमानांच्या उतरण्या – उड्डाणाचा सराव नुकताच झाला. मात्र, पाक व चीन याबाबत आपल्यापुढे आहेत..

मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर २०१७ रोजी भारतीय वायुसेनेने आपल्या शक्तिप्रदर्शनार्थ तसेच युद्धजन्य परिस्थिती प्रशिक्षणासाठी उत्तर प्रदेशातील उन्नाव जवळच्या लखनौ आग्रा एक्सप्रेस वेवरील चार किलोमीटर भागावर २० लढाऊ विमानांच्या उतरण्या उड्डाणाचा सराव केला. दोन तासांच्या या हवाई प्रशिक्षणामध्ये वायुसेनेचे २०० गरुड कमांडो आणि १२ गाड्या आणणारे अमेरिकन सी १३० जे सुपर हर्क्युलस ट्रान्सपोर्ट विमान, ङ्ग्रान्सकडून केलेली देसॉल्ट मिराज २००० व जग्वार विमाने, रशियाची सुखॉय ३० एमआय १ ङ्गायटर व एएन३२ बॉंबर विमाने आणि विमानांसाठी लागणार्‍या रसद व दारुगोळ्याचा समावेश करण्यात आला होता. सी १३० सुपर हर्क्युलस विमान लँडिंग करुन तेथे रस्त्यावरच थांबले. मात्र इतर लढाऊ विमानांनी लँड केल्यावर थांबण्याऐवजी थोडे समोर जाऊन परत उड्डाण भरारी घेतली.

वायुसेनेचे विमानतळ शत्रूने हवाई हल्ल्यांद्वारे नष्ट केल्यास वा त्यावर वायूहल्ला झाल्यास तेथे तैनात वायूसैनिक आणि वैमानिकांनी अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असावे या उद्देशाने हे प्रशिक्षण पार पडले. मे २०१६ मध्ये दिल्लीजवळील यमुना एक्सप्रेस वेवर मिराज २००० प्रणालीच्या विमानांनी लँडिंग करुन अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा ओनामा केला होता. भारतीय वायुसेनेचे ५३ विमानतळ असून त्यांनी ओडिसा, झारखंड व छत्तीसगडमधील तीन हायवेजसह यमुना व आग्रा एक्सप्रेस हायवेसारखे बारा एक्सप्रेस वेज अशा आपत्कालीन परिस्थितीमधील लँडिंग व टेक ऑङ्गसाठी निश्‍चित केले आहेत.

सी १३० विमानांनी ‘टच डाऊन’ केल्यावर त्यातून वायुसेनेचे गरुड कमांडो त्यांच्या गाड्यांसह तत्काळ बाहेर पडले आणि त्यांनी रस्त्याच्या ज्या पट्टयावर विमाने उतरणार होती, त्या क्षेत्राला सुरक्षित केले. हे प्रशिक्षण वायुसेनेच्या अलाहबाद स्थित सेंट्रले एयर कमांडच्या बक्षिका तालाब एअर बेसच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. अशा प्रकारचे प्रशिक्षण एक दिवसांत आयोजित होत नाही. युद्धजन्य परिस्थितीतही याची तयारी करण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागतो. या रस्त्यांवर इंधन व दारुगोळा पुरवठा, दुरुस्तीची आयामी तजवीज आणि सुरक्षा व्यवस्था लागू करावी लागते. आग्रा हायवेवरील या प्रशिक्षणासाठी तो आठ दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्याला संपूर्णतः साङ्ग करावे लागले, कारण एक छोटा खडा किंवा काडीदेखील लढाऊ विमानाच्या संवेदनशील इंजिनाच्या रोटेटिंग ङ्गिन्ससाठी घातक ठरू शकते. विमानांना उतरण्यासाठी अशा रस्त्यांवर डांबराचा जाड थर देऊन तेथे एअर ट्रॅङ्गिक कंट्रोल, सेफ्टी सर्व्हिसेस, रेस्क्यु व्हेईकल्स आणि बर्ड क्लियरन्स पार्टिज तैनात कराव्या लागतात. वायुसेनेने या आधी २०१५ मध्ये उत्तर प्रदेशातील सैफेई, इटावा आणि नंतर यमुना एक्सप्रेस वेवर विमाने उतरवली होती. २०१६ मध्ये रस्ता व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरींनी अशा प्रकारच्या कारवाईसाठी लागणारे हायवे, एक्सप्रेस वे निश्‍चित करण्यासाठी एका समितीची नियुक्ती केली. या समितीने २१ रस्त्यांची निवड केली; पण नंतर त्यांची संख्या १२ वर आणली. बाकी ९ रस्त्यांसाठी वाटाघाटी होत असून येत्या काही दिवसांमध्ये त्यांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

युद्धात एअरबेस आणि त्यात असलेला रनवे हे शत्रूच्या लष्करी विमानांचे पहिले लक्ष्य असते. त्यामुळे त्यांचा विद्ध्वंस झाल्यावर सैनिकी विमानांना उतरण्यासाठी आणि त्यानुसार एयरबेसमधील रनवेचे काम करण्यासाठी बनवलेल्या कुठल्याही हायवे किंवा मोटरवेच्या भागाला रोड रनवे किंवा हायवे स्ट्रीप म्हणतात. अशा प्रकारची पहिली हायवे स्ट्रीप दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस जर्मनीमध्ये बनवण्यात आली होती. या स्ट्रिप्स हायवेच्या दोन ते तीन किलोमीटर लांबीच्या सरळ भागात बनवल्या जातात. अशा रस्त्यांवर सहज उचलले जाणारे, बाजूला होऊ शकणारे दुभाजक असतात. ते हटवल्यानंतर विमान रस्त्याच्या संपूर्ण रुंदीचा वापर करू शकते. अशा भागांच्या आजूबाजूला अंडरग्राऊंड हँगर्स, टॅक्सीवेज आणि एअरपोर्ट रँप्स बनवले जातात. अशा भागांचा पाया कॉंक्रिटने बनवण्यात येऊन त्यावर डांबराचे जाड कोटिंग देण्यात येते. मोटरवेवरील अशा भागांना हायवे स्ट्रीप्समध्ये बदलण्यासाठी किमान २४ ते ४८ तास लागतात. जेथे हायवे स्ट्रीपची लांबी लढाऊ विमानांच्या लँडिंगसाठी पुरेशी नसते, तिथे जुन्या विमानवाहू जहाजांवर असणारी ‘अरेस्टर वायर कॅटोबार सिस्टीम’ बसवण्यात येते.

वर उल्लेखल्यानुसार हायवे स्ट्रीपची लांबी २००० मीटर्सपेक्षा जास्त असणे आवश्यक असते. याची बेस ३०-४० सेंटीमीटर्सच्या हाय स्ट्रेंथ मटेरियल कॉंक्रिटची असते. साध्या हायवेची बेस सहा ते आठ सेंटीमीटर्सच्या दगड व सिमेंटची बनलेली असते. धूळ, रेती, पावसाचे पाणी किंवा बर्ङ्गापासून बचावासाठी यावर स्पेशल बिटुमिनस कॉंक्रिटचा थर टाकण्यात येतो. त्यांच्या सान्निध्यात १२ ङ्गुटांपेक्षा जास्त उंचीची कुठल्याही प्रकारची इमारत आणि संसाधनप्रणाली, ट्रॅङ्गिक बॅरियर, आजूबाजूचे काटेरी कुंपण किंवा बाऊंडरी वॉलच्या उभारणीची मनाई असते. हायवे ट्रीपच्या क्षेत्रात विमानांच्या टर्न अराऊंडसाठी आखीव जागा राखलेली असते. अशा हायवे स्ट्रीपच्या क्षेत्रांची माहिती अतिगोपनीय असल्यामुळे त्यांची नक्की कल्पना ङ्गारच कमी लोकांना असते.

भारतातील अशा प्रकारच्या हायवे स्ट्रीप्स असलेले एक्सप्रेस वेज किंवा हायवेज केवळ ज्यावेळी त्यांचा उपयोग करायचा असेल त्याच वेळी सामान्य वाहतुकीसाठी बंद करण्यात येतील. इतर वेळी ते सामान्य लोकांच्या वापरासाठी खुले असतील असे केंद्रीय रस्ताबांधणी मंत्री नितीन गडकरींनी सांगितल्यामुळे या प्रस्तावाचा आयाम व आवाका एकदम विशाल झाला. अशा हायवे स्ट्रीपच्या सङ्गल उभारणीसाठी सिव्हल एव्हिएशन, संरक्षण आणि रस्ते बांधणी मंत्रालयांमधील सर्वंकष समन्वयाची नितांत आवश्यकता असेल. या योजनेचा आवाका मोठा असला तरी प्रत्यक्ष पंतप्रधानांचा यावर वरदहस्त असल्यामुळे ही सङ्गल कार्यान्वित होईल यात शंकाच नाही.

पाकिस्तानने २०१६ मध्ये लाहोर इस्लामाबाद मोटर वेवर एक्सरसाईज हॉलमार्क अंतर्गत लढाऊ विमान उतरवून या इमर्जन्सी लँडिंग प्रोसेसचा श्रीगणेशा केला होता. चीनने तिबेट, मंचुरिया आणि हेनानमध्ये यासाठी १.०४ लाख किलोमीटरर्सच्या रस्त्यांचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण केले आहे. भारताविरुद्ध तिबेटमधील झेंगझाऊ मिनक्विन सुपर हायवेवर चीनने दहा हायवे स्ट्रीप्स तयार केले आहेत. त्या तुलनेत या क्षेत्रामधील भारताची प्रगती नगण्यच म्हणावी लागेल, पण सांप्रत सरकारने सीमाक्षेत्रातील संसाधनक्षमता वाढीसाठी ७ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी भविष्यात याची सङ्गलता दृष्टिगोचर होईल.