आनंद संयुक्त द्वितीय

0
72

भारतीय ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद याने आईल ऑफ मॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त दुसरे स्थान मिळविले. नॉर्वेच्या विश्‍वविजेत्या मॅग्नस कार्लसनने नवव्या व अखेरच्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याला नमवून ७.५ गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली. जेतेपदासह कार्लसनने ५०,००० पौंड्‌सची कमाई केली.

आनंदनने नवव्या फेरीत चीनचा ग्रँडमास्टर होऊ यिफान याच्यावर ५३ चालींत विजय मिळवून आपली गुणसंख्या ७ केली. अखेरच्या फेरीतील बरोबरीमुळे नाकामुराला द्वितीय स्थान विभागून घ्यावे लागले. विदित गुजराती व स्वप्निल धोपाडे (प्रत्येकी ६.५ गुण) यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांनी अखेरच्या फेरीत अनुक्रमे रेपॉर्ट रिचर्ड (हंगेरी) व इलानोव पावेल (युक्रेन) यांच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविला.
अन्य भारतीय खेळाडूंमध्ये सुनिलदत्त नारायणन याने ६ गुणांसह संयुक्त १३वा क्रमांक मिळविला. त्याने अंतिम फेरीत वालेयो पोन्स फ्रान्सिस्को याच्याविरुद्ध गुण विभागून घेतला. ५ गुणांसह एस.पी. सेतुरामनला ४८व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. द्रोणावली हरिका व बी.अधिबन यांनी डेगेटियारेव इव्हेजनी व बाशियावेली निनो यांना नमवून विजयाने सांगता केली. १२ वर्षीय प्रगनंदा याने बालिंट विलमोसला धक्का देत विजयासह स्पर्धेचा निरोप घेतला.