आनंदची पुन्हा बरोबरी

0
116

अल्टिबॉक्स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या विश्‍वनाथन आनंद याला अजूनपर्यंत विजय गवसलेला नाही. काल सो’वारी झालेल्या स्पर्धेच्या सहाव्या फेरीत त्याने अझरबैजानच्या शाखरियार मेमेदेरोव याच्याविरुद्धचा सामना बरोबरीत सोडविला. सहाव्या बरोबरीसह आनंदचे २.५ गुण झाले आहेत. पुढील फेरीत आनंदचा सामना वाचिएर लाग्रेव याच्याशी होणार आहे. यानंतर कारुआना व कर्जाकिन यांच्याविरुद्ध आनंद आपले शेवटचे दोन सामने खेळणार आहे.

अमेरिकेच्या वेस्ली सो याने सनसनाटी निकालाची नोंद करताना विश्‍वविजेत्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. बुद्धिबळाच्या या शास्त्रीय प्रकारात वेस्ली याने प्रथमच कार्लसनवर विजय प्राप्त केला. मागील ३७ शास्त्रीय डावातील कार्लसनचा हा पहिलाच पराभव ठरला.

सहाव्या फेरीचा निकाल ः विश्‍वनाथन आनंद (२.५/५) बरोबरी वि. शाखरियार मेमेदेरोव (२.५/६), वेस्ली सो (३/५) वि. वि. मॅग्नस कार्लसन (३.५/६), हिकारू नाकामुरा (२.५/५) बरोबरी वि. मॅक्सिम वाचिएर लाग्रेव (२/५), लेवोन अरोनियन (३/६) बरोबरी वि. फाबियानो कारुआना (२.५/६)