आधुनिक यंत्राद्वारे शेती करा : पाटणेकर

0
102
बोर्डे डिचोली येथील शेतात भातकापणी योजनेचा शुभारंभ करताना डिचोलीचे आमदार राजेश पाटणकर. सोबत आनंद पळ, ईश्वर पळ, गोपाळ नामदेव पळ व इतर.

डिचोली (न. प्र.)
आज युवा पिढी शेतीकडे पाठ फिरवताना दिसते. मात्र, सरकारी योजनांचा लाभ घेत आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतातून भरपूर उत्पन्न मिळेल आणि युवा पिढीचा रोजगाराचा मार्ग निकालात निघेल. मात्र, यासाठी युवा पिढीने पुढे येत सरकारच्या शेतीपूरक विविध योजनांचा लाभ घेत आधुनिक यंत्राचा वापर करत शेती केली पाहिजे, असे आवाहन आमदार राजेश पाटणेकर यांनी केले.
डिचोली बोर्डे येथे यंत्राद्वारे भात कापणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यावेळी आनंद पळ, ईश्वर पळ. गोपाळ नामदेव पाल तसेच इतर शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटणेकर म्हणाले की, आजही शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेतकरी करताना दिसतात. त्यामुळे शेतीमध्ये प्रगती झाली नाही. युवा पिढीही नोकरीच्या मागे धावत असल्याने शेतीकडे दुर्लक्ष झाले आहे. अशा परिस्थितीत शेती टिकवायची असेल तर युवा पिढीने पुढाकार घेऊन शेतीबाबत असलेल्या सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. आधुनिक यंत्राचा वापर करून शेती केल्यास वेळ, पैसा दोन्ही गोष्टींची बचत होणार आहे. तसेच उत्पन्न भरघोस मिळणार आहे. त्यामुळे युवकांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीकडे वळावे.
दरम्यान, सध्या डिचोली परिसरात यंत्राद्वारे भातकापणी करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होत आहे.