आदिवासी कल्याण खात्याच्या केंद्रीय योजनांचा आढावा

0
68

केंद्रीय राज्यमंत्री (आदिवासी कल्याण) सुदर्शन भगत यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या केंद्रीय योजनांचा पर्वरी येथे सचिवालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी गोव्याचे आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे, आदिवासी कल्याण खात्याचे सचिव पी. एस. रेड्डी, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक व्हेनांन्सियो फुर्तादो, गोवा राज्य अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अजित पंचवाडकर उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या विविध योजनांची राज्यात कार्यवाही केली जात आहे. या योजनामध्ये एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय, आदिवासी सब प्लॅनसाठी खास निधी, आदिवासी विभागात आश्रम स्थापना, स्वयंरोजगार योजनेअर्तंगत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, एसटी समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थाना आर्थिक साहाय्य, मुलांसाठी शिष्यवृत्या, बुक बँक योजना आदी २२ योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या आदिवासी जमातीसाठीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना केंद्रीय मंत्री भगत यांनी केली.