आत्महत्या रोखता येते

0
333

– सुजाता भाटकर

या तरुणांवर उपचार करताना त्यांच्या कुटुंबियांना, पालकांना विश्वासात घेणे गरजचे आहे. किशोरांची आत्महत्या प्रवणता किंवा स्वत:ला नष्ट करून घेण्याची वागणूक किंवा भय, आक्रमकता, चिडचिड, निद्रानाश व अति वेगात बोलणे या गोष्टींवरून घरातून बारकाईने लक्ष ठेवण्यात आले पाहिजे.

‘आत्महत्या रोखता येते. जोडा, संपर्क साधा. काळजी घ्या.’ हा जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन, २०१६ चा मुख्य विषय आहे. जागतिक आरोग्य संघटना (थकज) यांनी गणना केल्याप्रमाणे अंदाजे ४००,००० माणसे दरवर्षी आत्महत्या करण्यामुळे मरत असतात. प्रत्येक ४० सेकंदात एक व्यक्ती २५ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असते.
जोडा –
ज्यांनी प्रेम गमावले आहे, किंवा ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याशी जोडून घ्यावे. त्यामुळे आत्महत्येच्या पुढच्या प्रयत्नापासून त्यांचा बचाव होऊ शकेल. ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला असेल; तसेच ज्यांना आधाराची गरज असेल, कोणा एकाकडे लक्ष देण्याची गरज असेल, तसेच ते मनाने व्यवस्थित असल्याची खात्री करा – ज्यामुळे परिस्थितीत खूप मोठा फरक पडेल.
सामाजिक संपर्क आत्महत्येचा धोका कमी करु शकतात. व्यक्ती, समुदाय, संस्था या संदर्भात जवाबदारी स्विकारू शकतात.
संपर्क साधा –
समाजात जागरुकता पसरवा. समुदायासाठी काळजी घेणारे कार्यक्रम राबवले पाहिजेत. माणसांना सुसज्ज करा की ज्यामुळे ते आत्महत्या रोखण्याच्या कोणत्याही धोरणात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. माणसाच्या व्यथा ऐकून घेणे गरजेचे आहे आणि त्यांना करुणेने वागविणे व सहानुभूती देणे आवश्यक आहे.
काळजी घ्या –
आत्महत्या रोखणारे धोरण, निर्माते व कार्यक्रम राबवणार्‍या लोकांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. आत्महत्या हे साक्षात मरण आहे. जे बळी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असतात; स्वतः तो किंवा ती; जे माहीत आहे किंवा त्याचा परिणाम होईल असा विश्वास सकारात्मक किंवा नकारात्मक कायदा, परिणाम आहे; ही मृत्युची व्याख्या आहे. या बाबी केवळ मृत्यू झाल्यास लागू आहेत.
स्वत:कडे दुर्लक्ष करणे आणि धोका पत्करण्याचे वर्तन – प्रामुख्याने रस्ता अपघाता संदर्भातील, हे देखील आत्महत्येच्या प्रकारात अंतर्भावित केले जाऊ शकते.
किशोरावस्थेतील आत्महत्या करण्यामागचे विविध घटक –
१. ताण
२. नैराश्य
३. पालकांचा दबाव व उच्च अपेक्षा
४. समुह (बरोबरच्या किशोरांचा) दबाव
५. शैक्षणिक प्रगती
६. जीवनपध्दती
७. व्यसने
८. पालक व कुटुंबातील अन्य घटकांशी जवळचे संबंध नसणे
९. विभक्त/एकेरी पालक
१०. लैंगीक छळ
नैराश्य व आत्महत्या करण्याची इच्छा यांच्यावर उपचार करता येतात. पालकांनी अशा मुलांवर जवळून लक्ष ठेवणे गरजेचे आहे. किशोरावस्थेतील मुलांत पुढे दिलेल्या खुणा दिसत असतील तर पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
१. जेवण्या/झोपण्याच्या विषयांत बदल होणे
२. मित्र, कुटूंब व इतर उपक्रमांपासून दूर जाणे
३. दूर जाणे व हिंसक वर्तन
४. अंमली द्रव्ये/दारुचे व्यसन
५. वैयक्तिक, दिसण्यासंदर्भात काही पडून गेलेले नसणे
६. व्यक्तिमत्वात बदल
७. शाळेत गुण कमी मिळणे
८. शारीरिक
९. जी ती वाईट व्यक्ती आहे अजून इतर लोकांना सांगणे.
१०. मी तुम्हाला परत पाहणार नाही आणि मी तुमच्यासाठी समस्या होणार नाही, अशी विधाने करणे.
११. आवडत्या वस्तूंना दूर लोटणे.
१२. सायकोसिसची चिन्हे दिसणे.
जर मूल वा किशोरावस्थेतील मूल- मी मला ठार करणार आहे किंवा मी आत्महत्या करणार आहे… असे म्हणू लागले तर त्याच्या विचारांची गंभीर दखल घ्या. मानसिक आरोग्यकोषातील व्यावसायिक लोकांची मदत घ्या. त्याला किंवा तिला नैराश्य वा आत्महत्येचा विचार आला आहे का, हे थेट विचारु नये. त्यांना भावना व्यक्त करायला मदत करा. तुम्ही त्यांची काळजी घेत आहात वा त्यांच्यावर प्रेम करत आहात हे त्यामुळे व्यक्त होईल. कुटुंबाचा आधार आणि योग्य वेळी योग्य हस्तक्षेप याची मुलांना मदत होऊ शकते आणि आत्महत्या करू पाहणार्‍या किशोरावस्थेतील मुलांना सांत्वन मिळू शकते व त्यांना त्यांच्या विकासाचा चांगला मार्ग गवसू शकतो.
आत्महत्या – धोक्याचे घटक
१. आत्महत्येचे मागील प्रयत्न
२. मन
३. पदार्थांचा गैरवापर
४. दुर्वर्तन व गैरवागणुकीचा इतिहास
५. कुटूंबातील आत्महत्येचा इतिहास
६. शारीरिक मानसिक आजारपण
७. भावनावश होणे व आक्रमक प्रवृत्ती
८. नाते गमावणे
९. आर्थिक व सामाजिक तोटा
१०. कोणी आत्महत्या केल्या असल्यास त्या दाखवणे
वयस्कर माणसापेक्षा तरुणांना मिडीया प्रदर्शनाचा जास्त धोका असतो आणि ते दूरदर्शनवर पाहिलेल्या आत्मघातकी वर्तनाचे अनुकरण जास्त प्रमाणात करु शकतात. वृत्तपत्र, अहवाल, मुख्य पानावरील लेख यामुळे किशोरवयीन आत्महत्यात वाढ होते. आत्महत्यांचे उल्लेख, तसा मजकूर असलेला लेख, शीर्षके, वर्णने, आत्महत्येची पध्दत वैयक्तिक आत्महत्येची कारणे ठरु शकतात.
आत्महत्येचे काही विशिष्ट जोखीम घटक अस्तित्वात आहेत. आरोग्याची काळजी घेणार्‍या व्यावसियिकांनी या जोखीम घटकांच्या निष्कर्षांचा अर्थ लावण्याची काळजी घेणं आवश्यक आहे. अभ्यास पाहणी असे दर्शवते की, मनोविकाराविषयीची लक्षणे असल्यास आत्मघातकी वर्तनात लक्षणीय वाढ असते. ९० टक्क्यांपेक्षा जास्त किशोरवयीन आत्महत्या बळी त्यांच्या मरणापूर्वी मानसिक संतुलन दर्शवत असतात. ‘पॅथोलॉजिकल’इटंरनेट वापर आत्मघातकी कल्पना शक्ती देऊ शकते.
व्हिडीयो गेम्सचा रोजचा वापर आणि इटंरनेटचा पाच तासाहून जास्त वापर यांचा उच्च दर्जाचे नैराश्य आणि किशोरवयातील आत्महत्या प्रकरणे यांच्याशी जास्त जवळचा संदर्भ आहे. इंटरनेवर आत्महत्येसंदर्भात विशेष माहिती शोधत बसणे हा देखील त्यामागचा हेतू असू शकतो.
बालरोगतज्ञांनी आत्महत्याप्रवण मुलांत- भावनात बदल होणे, वस्तूंचा गैरवापर आणि अवलंबून असण्यासंदर्भात प्राथमिक काळजी घेण्यासाठी बारकाईने अवलोकन केले पाहिजे. डॉक्टरांनी भावनिक समस्या, अंमली पदार्थांचा व दारुचा वापर, ताणाची अंदाजिन पातळी, काम करण्यातील असमर्थता नजरेस आणून दिली पाहिजे.
‘आत्मघातकी कल्पनाशक्ती अहवाल’ बारकाईने पाहिल्यास समजतो. तरुण मुले आत्महत्येसंदर्भात माहिती त्यांच्या अहवालानेच देऊ शकतात; जी माहिती ते तरुण प्रत्यक्ष द्यायला टाळतात ते तरुण आत्महत्या करण्याचा वाटेवर आहेत. त्यांच्यावर योग्य डॉक्टरी इलाज करणे अत्यावश्यक आहे. दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत- ‘आपण कधी स्वत:ला मारून टाकणे किंवा आपण मरावे असा विचार कधी मनात आला आहे का?’ आणि दुसरे ‘आपण कधी स्वत:ला इजा करण्याचा वा मारुन टाकण्याचा असा प्रयत्न केला आहे का?’ जर याचा प्रतिसाद होकारार्थी असेल तर त्या संदर्भात बालरोगतज्ञांनी जास्त माहिती गोळा करावी. त्याला पालकापासून वेगळे घेऊन, सदर किशोराचे समुपदेशन करावे कारण रुग्ण पालकांच्या अनुपस्थितीतच जास्त चांगली माहिती देऊ शकतो. किशोराच्या आरोग्यासंदर्भातील गोपनियता आवश्यक आहे; कारण या गोपनियतेपेक्षा या किशोराची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे. आणि बालरोगतज्ञाने हे सुरुवातीलाच सांगितले पाहिजे. सध्याच्या समस्या व संघर्ष ओळखता आले पाहिजे. आणि आत्महत्या करण्यासंदर्भातील पालकाची तपासणी केली पाहिजे. त्याचप्रमाणे त्या किशोराची आणि त्याच्या कुटूंबाची वर्तणूक यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ह्या किशोराकडे बोलताना, प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे की, त्याची मानसिक चिंता कमी झाली पाहिजे. किशोराचे आत्महत्येचे विचार व त्याच्यावर भाष्य यांना सहजपणे फेटाळून लावू नये. स्वत:ला मारण्याच्या विचाराच्या जवळपास पोचला आहे, असे त्याच्याकडे संबंध प्रस्थापित करुन त्याला सांगितले गेले पाहिजे की, हे तुझे कृत्य अयोग्य आहे, हे उघड करून त्या किशोराला मदत देण्यासाठी त्याला भेटले पाहिजे आणि त्याला मदत दिली पाहिजे, याचा त्याला फार उपयोग होऊ शकतो.
आत्मघातकी किशोरवयीन व्यवस्थापन :-
धोक्याच्या पातळीवर व्यवस्थापन अवलंबून असते हा हेतु एक कळीची समस्या आहे. कमी जोखीम घेणे, निर्धास्त करणे कठीण आहे. नुकत्याच केलेल्या आत्महत्येच्या अलिकडील प्रयत्नांत कल्पनाशक्तीचा अभाव हे एक प्रमुख कारण आहे आणि ही दिशाभूल होऊ शकते. साधारणपणे संशयाचा फायदा घेणे ही आत्मघातकी व्यवस्थापन सुटका आहे जी धोक्याच्या उच्च पातळीचा निर्देश करते. विशेषत: जिथे मदतीचा हात आणि आधार देणारे कुटुंब तिथे कमी धोका दर्शवला जातो. आणि अपरिहार्यपणे कमी धोका सूचित केला जाऊ शकतो.
किशोराची वागणूक पाहून, आत्महत्येच्या प्रयत्नाची थेट व्याख्या विचारून किंवा अहवालद्वारे बारकाईने ताडून पाहू शकतो. सुरवातीला किशोराची धोका पातळी कमी असते व त्याला परत परत मानसोपचार तज्ञांची गरज असते व त्याच्याशी संबंधित असलेल्यांनी त्याची संपूर्ण तपासणी करणे गरजेचे आहे आणि त्याची मानसिक आरोग्यतज्ञांकडून तपासणी होणे गरजेचे आहे. आणि ज्या किशोरांना ज्यांची आत्महत्या करण्याची पातळी उच्च आहे, त्यांनी व्यावसायिक मानसिक आरोग्यतज्ञांकडून कार्यालयीन वेळेत तपासणी करून घेणे गरजेचे आहे. ज्या किशोराला कुटुंबाचा आधार आहे; अशा वागणूक ढासळत चाललेल्या किशोराला पाहून, त्यानी बाह्यरूग्ण सेवा घ्यावी. आणि ज्या किशोरांनी आधीच आत्महत्येचे प्रयत्न केले आहेत: त्यांना मात्र उच्च पातळीवर उपचारांची गरज आहे.
आत्महत्याप्रणव किशोराबरोबर काम करणे व त्याला मदत करणे अवघड असते. आत्महत्या धोका पातळी कमी करता येते पण त्याचे उच्चाटन कधीच करता येत नाही. आणि ही माहिती संबंधित किशोराकडून मिळवता येते. अन्न व औषध प्रशासन (एफ्‌डीए) यांनी औषधाच्या उपयोगावर मनाई आणू नये. नैराश्य प्रतिबंधक औषधांमध्ये फ्लोक्झेटिन सर्वाधिक पसंतीचे औषध आहे आणि या किशोरांची वर्तवणूक सुधारण्यासाठी त्यांच्यावर जवळून लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
या तरुणांवर उपचार करताना त्यांच्या कुटुंबियांना, पालकांना विश्वासात घेणे गरजचे आहे. किशोरांची आत्महत्या प्रवणता किंवा स्वत:ला नष्ट करून घेण्याची वागणूक किंवा भय, आक्रमकता, चिडचिड, निद्रानाश व अति वेगात बोलणे या गोष्टींवरून घरातून बारकाईने लक्ष ठेवण्यात आले पाहिजे.
सारांश…
१. किशोरवयीन आत्महत्या ही एक महत्त्वाची सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.
२. जोखीम घटक – ज्ञान विशेषत: बदलती मन:स्थिती, गुंडगिरी, फसवणूक आणि वाईट कृत्य असू शकते आणि या किशोरासाठी निश्तितपणे साह्य करता येते.
३. संभाव्य आत्मघातकी किशोरांसाठी योग्य तंत्राचा वापर करणे महत्त्वाचे आहे.
४. आत्महत्येच्या धोका पध्दतींवर व्यवस्थापन पर्याय अवलंबून असतात.
५. नैराश्यविरोधक वरील वैद्यकीय उपचार पध्दती जास्त परिणामकारक आहेत.