आत्मनिर्भरतेची शपथ स्वातंत्र्यदिनी घ्या

0
122

>> मोदींचे ‘मन की बात’मधून आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी येत्या स्वातंत्र्यदिनी त्यांनी देशवासीयांना आत्मनिर्भर होण्याची शपथ घ्या असे आवाहन केले.

पंतप्रधान म्हणाले की, पुढच्या मन की बातच्या अगोदर भारताचा स्वातंत्र्यदिन येणार आहे. यावेळचा स्वातंत्र्यदिन वेगळ्या परिस्थितीत साजरा होणार आहे. मात्र कोरोनाच्या या संकटात देशवासीयांनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प करावा. कोरोनापासून स्वतंत्र होण्याचा, काहीतरी नवीन शिकण्याचा व शिकवण्याचा, संकल्प करा असे आवाहन केले.

आज काही महान नेत्यांमुळे भारत देशाला एक वेगळी उंची लाभलेली आहे. त्यातील एक नेते म्हणजे लोकमान्य टिळक. टिळकांची १ रोजी शंभरावी पुण्यतिथी असून टिळकांचे जीवन आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
कोरोनाबाबत पंतप्रधानांनी, मागील काही महिन्यांपासून देशाने एकजुटीने कोरोनाचा सामना केला आहे. त्यामुळे अनेक शंका चुकीच्या ठरवल्या. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत चांगले असून मृत्युदरही कमी असल्याचे सांगितले.