आझमच्या टी-२० संघात सहा भारतीय

0
152

पाकिस्तानचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील विद्यमान कर्णधार बाबर आझमने भारत आणि पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश असलेला संयुक्त टी-२० संघ निवडला आहे. त्याने निवडलेल्या आपल्या संघात ६ भारतीय खेळाडूंचा समवेश केला आहे. क्रिकबझसाठी हर्षा भोगले याच्याशी बोलताना बाबरने हा संघ निवडला आहे.

बाबरने स्वतःच्या साथीत सलामीवीर म्हणून भारताचा विस्फोटक फलंदाज हिटमॅन रोहित शर्माला पसंती दिली आहे. तिसर्‍या स्थानासाठी कोणताही संकोच न करता बाबरने टीम इंडियाचा विद्यमान आक्रमक कर्णधार विराट कोहलीचे नाव घेतले. चौथ्या स्थानी त्याने आपल्या देशाचा अष्टपैलू खेळाडू शोएब अख्तरचा समावेश केला.

पाचव्या स्थानी बाबरने आपल्या संघात महेंद्रसिंह धोनीची निवड केली आहे. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू म्हणून शादाब खान आणि हार्दिक पंड्या यांना निवडले. अपेक्षेप्रमाणे त्याने आपल्या संघात द्रुतगती गोलंदाज म्हणून पाकिस्तानी गोलंदाजांना जास्त पसंती दिली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या रूपाने केवळ एकट्या भारतीय तेज गोलंदाजाला संधी दिली आहे. तर आपल्या देशाच्या शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद अमीर यांची निवड केली आहे. फिरकीपटू म्हणून टीम इंडियाच्या कुलदीप यादवला निवडले आहे.

बाबर आझमने भारत-पाकिस्तानचा निवडलेला संयुक्त टी -२० एकादश संघ पुढील प्रमाणे ः रोहित शर्मा, बाबर आझम, विराट कोहली, शोएब मलिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या, शादाब खान, मोहम्मद अमीर, शाहीन आफ्रिदी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.