आके केंद्रावर आज फेरमतदान

0
105

मडगाव मतदारसंघातील आके येथील टी. बी. कुन्हा हायस्कूलच्या मतदान केंद्र क्रमांक ८ वर आज दि. ७ रोजी फेरमतदान घेण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे मतदान सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे.

४ फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभा निवडणूक मतदानावेळी वरील मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हाताळण्यात झालेल्या चुकीमुळे या केंद्रावरील मतदानच रद्द करण्यात आले होते. या मतदान केंद्रावर एकूण ७९१ मतदार असून मतदान प्रक्रिया नवे मतदान पथक पूर्ण करणार असल्याचे निर्वाचन अधिकारी उदय प्रभुदेसाई यांनी सांगितले. सदोष मतदान पद्धती दोन तासानंतर निदर्शनास आल्यानंतर कॉंग्रेस उमेदवार दिगंबर कामत व भाजपचे शर्मद पै रायतूरकर यांनी फेरमतदानाची मागणी केली होती.
दरम्यान, आके केंद्रावर आज फेरमतदान होणार असल्याने मडगाव मतदारसंघ व जवळपास असलेल्या फातोर्डा व नावेली भागात कोरडे दिवस जाहीर करण्यात आले आहेत. तसेच तेथील कर्मचारी व कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. खासगी क्षेत्रातील आस्थापनांना ही सुट्टी लागू असेल.