आकाश, अंकितचा सनसनाटी विजय

0
85

पणजी (क्री.प्र.)
पहिल्या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स खुल्या बुद्धिबळ स्पर्धेतील काल बुधवारचा दिवस धक्कादायक निकालांचा ठरला. गोवा बुद्धिबळ संघटनेने ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेत काल आंतरराष्ट्रीय मास्टर आकाश जी. व फिडे मास्टर गजवा अंकित यांनी गाजवला. अव्वल मानांकन लाभलेला ग्रँडमास्टर क्रास्टसिव मार्टिन (२६५४) व ग्रँडमास्टर आलेक्झांडर प्रेडके यांना अनुक्रमे अंकित (२२५४) व आकाश (२४२४) यांनी पराभवाचा धक्का दिला. अंकितने आपल्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय साकार करताना केवळ २२ चालींत सामना आपल्या नावे केला. ग्रँडमास्टर सिवुक विताली व इदानी पौवया यांनी गुण विभागून घेतला तर तेर साहाकायान सामवेल याला युक्रेनचा ग्रँडमास्टर बेर्नाडस्की विताली याने हरविले. अमेय अवदी व नितीश बेलुरकर यांनी आपापल्या सामन्यांत विजय मिळवत आपली गुणसंख्या ४.५ केली. भक्ती कुलकर्णीला केरळच्या अनिल कुमारने बरोबरीत रोखले. तिचे ३.५ गुण आहेत. नीरज सारिपल्ली, उमंग कैसरे, विल्सन क्रुझ व गुंजल चोपडेकर यांनीदेखील काल विजय मिळविले.