आईला पर्याय नसतो : पौडवाल

0
124

आईला पर्याय नसतो. महिलांनी कुठल्याही क्षेत्रात पुढे येताना कुटुंबाचा त्याग करू नये. आईच मुलांना चांगलं वाढवू शकते, समाजाला चांगले बनवू शकते. महिला सशक्तीकरण म्हणजे तोकडे कपडे घालणे, सिगरेट ओढणे नव्हे असा सूचक सल्ला ‘हितगुज’ कार्यक्रमात ख्यातनाम गायिका अनुराधा पौडवाल यांनी काल दिला. गाण्याची रितसर तालीम केली नाही; परंतु अवकात नसताना मोठमोठ्या संगीतकारांकडे गायला मिळाले. योग्यतेपेक्षा खूप मिळाले असून त्यात तृप्त आहे, असे प्रांजळपणे नमूद करून आचार विचारात संतुलन असते तेव्हाच ते गाण्यात उतरते. गाण्याला आत्मा, भावना असतात त्यात एकरुप व्हावे लागते असे त्यांनी सांगितले.

‘स्वस्तिक’ने कला अकादमी गोवाच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी तुडूंब गर्दी केली होती. कृष्ण कक्षाबाहेर या खेपेला स्क्रीनही लावली होती. प्रा. संगीता अभ्यंकर यांनी ‘हितगुज’ मध्ये त्यांच्याशी संवाद साधला. लहानपणी माझा आवाज घोगरा होता. रेडिओवर दोन्ही वेळा पळुस्कर, माणिकताईंची गाणी ऐकायची. चांगल्या घरच्या मुलींनी फिल्म उद्योग क्षेत्रात जायचा विचार करणेसुद्धा त्याकाळी भीती वाटायची. एके दिवशी शाळेत शिकत असताना मला लतादिदींच्या रेकॉर्डिंगला जाण्याचे भाग्य मिळाले आणि त्या गातांना ऐकून दुनियेतील आवाज म्हणजे हा ही अनुभूती झाली असे लतादिदींना दैवत मानणार्‍या अनुराधा पौडवाल यांनी सांगितले.

आशा भोसलेंबरोबर ङ्गआला आला वाराफ हे एकमेव द्वंदगीत गाण्याचा प्रसंग अनुराधाताईंनी कथन केला तसेच आयुष्यात ङ्गनशिबङ्घ म्हणता येईल, चमत्कार म्हणता येईल, असे प्रसंग त्यांनी सांगून रसिकांना अंतर्मुख केले. एकदा मी अरुणजींना (संगीतकार व अनुराधाताईंचे पती) जेवणाचा डबा घेऊन गेले असता सरदारजी ड्रायव्हरने शंकराची पुजा करत जा असा सल्ला दिला आणि चमत्कार असा घडला, की बर्मनदांनी अरुणजींना एक श्‍लोक गाऊन हवा असे सांगताच माझ्या आवाजात त्यांनी रेकॉडींग करून नेलेली टेप ऐकवली तेव्हा वर्मनदांनी हा कोणाचा आवाज असे विचारले तेव्हा ङ्गबायकोचाफ असे अरुणजींनी उत्तर देताच ते म्हणाले, ङ्गतू कधीच बायको गाते म्हटले नाहीसफ व त्यांनी चौवीस तासांच्या आत माझे रेकॉर्डींग करून टाकले असे अनुराधाताईंनी सांगितले. आपण १९७३ मध्ये ङ्गअभिमानफ चित्रपटात श्‍लोक गाऊन फिल्म इंडस्ट्रिजमध्ये गायिका म्हणून पदार्पण केल्याचे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, अरुणजींचे एक तत्त्व होते, की बायको म्हणून मी कुणाकडे गायला तुझी शिफारस करणार नाही. तुझ्या गुणवत्तेवर तू गायला हवे, असे ते स्पष्ट सांगायचे. सासू – सासर्‍यांचाही मला खूप पाठिंबा मिळाला. एकदा लतादिदींनी गायिलेल्या रेकॉर्डिंगवेळी त्यांच्या गाण्याचा पेपर मिळाला व ते गीत युववाणीत मी गायिले अर्थात अलका नाडकर्णी म्हणून. तेव्हा हृदयनाथजींनी ते ऐकून रेडिओला फोन करून हे आत्ताच रेकॉर्डींग झालेले गाणे तुम्हाला कसे मिळाले असे विचारले व मी गायिल्याचे ऐकताच त्यांनी मला बोलावून घेतले व त्यांच्याकडे गाण्याची संधी मिळाली. तो किस्सा अनुराधाताईंनी सांगितला.

शंभो शंकरा करुणाघना… हे गाणे रेकॉर्डींग करताना पूर्ण आवाज खराब होता. गाणे शक्यच नव्हते. अशावेळी अक्षरशः ङ्गडू ऑर डायफ परिस्थितीत मला गायला लावले व आश्‍चर्य घडले की ते गाणे सुरवात ते शेवट चांगले झाले. हाही प्रसंग त्यांनी आवर्जून सांगितला. त्या म्हणाल्या ईश्‍वराने मला समाधान दिले आहे. सुर्योदय फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांचे जे सामाजिक कार्य सुरू आहे त्याबद्दलही त्यांनी संबंधित प्रश्‍नावर सांगितले. जुनी गाणी घेऊन आजची पिढी तोडमोड करून गातात त्याबद्दलही त्या बोलल्या. आजच्या फास्ट फुडच्या जमान्यात नवनवीन युवा कलाकारांना ङ्गरिस्कफ आहे असे त्या म्हणाल्या.

मला पद्मम किताब मिळावा म्हणून हितचिंतकांनी बायोडाटा वगैरे पाठवला तेव्हा मिळाला नाही तेव्हा मनाला लागले; पण मी कधीच महत्वाकांक्षी नव्हते. मात्र तेव्हा म्हटले ङ्गदेवी तूला वाटले तर मला पद्मश्री वगैरे मिळेल. आणि काय चमत्कार गेल्या वर्षी बायोडाटा वगैरे न पाठवता, शिफारशी शिवाय पद्मश्री मिळाली. हाही किस्सा अनुराधाताईंनी सांगितला. गायिका झाले नसते तर शेफ व्हायला आवडले असते. केक डेकोरेशन, साखरेच्या कलाकृती वस्तू करायला आवडतात असे त्यांनी स्पष्ट केले. आदित्य व कविता ही दोन्ही मुले संगीत क्षेत्रात असल्याचेही त्यांनी सांगितले. ङ्गस्वस्तिकफचे अध्यक्ष डॉ. प्रविण गावकर यांनी स्वागत केले. अनुराधाताई, कॉपर लिफचे मालक श्रीकांत पै बीर, विनयकुमार मंत्रवादी, अनिल लाड यांनी समई प्रज्वलनात सहभाग घेतला.

ज्येष्ठांकडे दुर्लक्ष नको
अनुराधाताईंनी ज्येष्ठांकडे जास्त लक्ष द्या असे जाता जाता कळकळीचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, ज्या घरात आजोबा – आजी असतात ती मुले बिघडत नाहीत. मी आज सासूमुळे उभी आहे. तिने मुलांचे केले. सासू-सासर्‍यांबरोबर राहण्याची संस्कृती पुन्हा सुरू करा. आपण आभाळाला ठिगळ लावू शकत नाही; परंतु एकाने एकट्याला मदत केली तरी खूप आहे, असे त्यांनी आपल्या सामाजिक उपक्रमांविषयी बोलताना सांगितले.