आंतरराष्ट्रीय लेखक-वाचक महोत्सवाचे पणजीत आयोजन

0
123

गोवा कला अकादमी संकुलात येत्या दि. ४ ते ६ ऑक्टोबर अशा तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय लेखक आणि वाचक महोत्सवाचे आयोजन केले असून या महोत्सवात देशी-विदेशी साहित्यिक सहभागी होतील, अशी माहिती महोत्सवाचे संचालक अहलम अनिल कुमार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
गोव्यात कोकणी, मराठी, इंग्रजी, कानडी, इंग्रजी, पोर्तुगीज अशा सहा भाषांतून साहित्य निर्मिती होते. त्यामुळे या महोत्सवासाठी गोव्याची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. कॉर्पोरेट संस्था साहित्य व सांस्कृतिक उपक्रमासाठी विशेष निधी खर्च करण्यास राजी नसतात. परंतु येस बँकेने व फ्लिपकार्टने हा महोत्सव प्रायोजित केल्याचे त्यांनी सांगितले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी झोपडपट्टीतील मुलांसाठी काम करणार्‍या गोवा फॉरगिव्हींग संस्थेचेही सहकार्य असल्याचे ते म्हणाले. या महोत्सवात थॉमस केनेली, लुइस दे बर्नियर, दामोदर मावजो, मिंगेल सिझीको, मृदूला कोशी, जुझे रॉड्रिगीस, दोस सांतोस, सुदीप सेन, सीपी अरुण रमण, हातोश सिंग बाल, कुट्टी रेवती, तिशनी दोशी, मनोहर शेट्टी, संदेश प्रभूदेसाई, किशवार देसाई, सिध्दार्थ भाटिया, सेम मिलेर, मनु जोसेफ, आलेक्झेंडर बार्बोझा आदी साहित्यिकांचा समावेश असेल. या महोत्सवात कविता, नाटक, इतिहास, तत्वज्ञान, निबंधकार एका छताखाली येऊन आपल्या साहित्याचे दर्शन घडवतील.