आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आज पुनरागमन

0
152

>> इंग्लंड-विंडीज पहिली कसोटी आजपासून

पाहुणा वेस्ट इंडीज व यजमान इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आजपासून रोझ बॉल येथे जैव सुरक्षित वातावरणात खेळविला जाणार आहे. कोरोना विषाणूंमुळे तब्बल चार महिन्यांचा ब्रेक मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटचे पुनरागमन या सामन्याद्वारे क्रिकेटच्या मायभूमीत होणार आहे.

इंग्लंडचा संघ नियमित कर्णधार ज्यो रुट याच्याविना मैदानात उतरणार आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स त्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणार आहे. रुट संघात नसल्यामुळे इंग्लंडची आघाडी फळी अननुभवी झाली आहे. रॉरी बर्न्स (१५), डॉम सिबली (६), ज्यो डेन्ली (१४), झॅक क्रॉवली (४) या आघाडी फळीतील खेळाडूंच्या गाठीशी फारसा अनुभव नाही. सहाव्या स्थानावर फलंदाजी करणे अपेक्षित असलेला ओली पोप (६) देखील अननुभवी आहे. याच्या तुलनेत विंडीजचा सलामीवीर क्रेग ब्रेथवेट याच्या गाठीशी ५९ कसोटींचा अनुभव आहे. त्यामुळे स्टोक्स व बटलर यांना आपला सर्व अनुभव पणाला लावावा लागणार आहे. खेळपट्टी संथ राहण्याची शक्यता लक्षात घेता ऑफस्पिनर डॉम बेस याची जागा जवळपास निश्‍चित आहे. उर्वरित तीन जागांसाठी अँडरसन, आर्चर, ब्रॉड, वूड व वोक्स यांच्यात प्रचंड स्पर्धा आहे.

दुसरीकडे विंडीज संघाचा विचार केल्यास क्रेग ब्रेथवेटचा सलामी जोडीदार म्हणून वनडे स्पेशलिस्ट जॉन कॅम्पबेल व संघात पुनरागगमन केलेला जर्मेन ब्लॅकवूड यांच्यापैकी एकाची निवड त्यांना करावी लागणार आहे. ऑफ स्पिन गोलंदाजी करणारा अष्टपैलू रॉस्टन चेज व स्पेशलिस्ट ऑफस्पिनर रहकीम कॉर्नवाल यांच्या रुपात दोन फिरकीपटू विंडीजचा संघ उतरवणार आहे. त्यांची गोलंदाजी फळीदेखील स्थिरावलेली आहे. अल्झारी जोसेफ, शेन्नन गेब्रियल व किमार रोच यांच्या जोडीला कर्णधार जेसन होल्डर असेल.
निदान कागदावर तरी विंडीजचा संघ इंग्लंडपेक्षा अधिक समतोल भासत आहे. परंतु, घरच्या वातावरणात खेळण्याचा लाभ यजमान संघाला होऊ शकतो. उभय संघांनी मागील दोन-तीन महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नसल्यामुळे विशेषकरून फलंदाजांच्या फॉर्मची कसोटी लागणा

इंग्लंडकडे वेगवान गोलंदाजांची फौज
‘गोलंदाजीचे सहा किंवा सात सक्षम पर्याय असण्याची परिस्थिती फार क्वचितच येते. २०१५ साली विश्‍वचषकासाठी संघ बांधणी करताना आमच्याकडे याच प्रकारची स्थिती होती. ऑस्ट्रेलियातील ऍशेस मालिका व भारताविरुद्धच्या मालिकेत खेळविण्यासाठी देखील आमच्याकडे पुरेसे वेगवान गोलंदाज आहेत असे वाटते. कसोटीसाठी वेगवान गोलंदाजांची फौज असणे भाग्याचे असते’
– बेन स्टोक्स, इंग्लंड कर्णधार