अस्त दुर्दम्य इच्छाशक्तीचा

0
139
  • डॉ.दिपक शिकारपूर

शारीरिक विकलांगत्व असूनही आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेने जगाला स्तिमित करून सोडलेले प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे काल निधन झाले. या आगळ्यावेगळ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली –

शरीराचे सर्व अवयव सुस्थितीत असूनही, अंगात भरपूर बळ असूनही स्वत:ला दुबळं समजणार्‍या माणसांचा करंटेपणा त्यांच्याच अधोगतीस कारण ठरत असतो. हे लोक स्वत:कडील बुद्धीचा, शारीरिक आणि मानसिक ताकदीचा कधी विचारच करत नाहीत. संधीचा शोध घेण्यात आयुष्यातील मौलिक क्षण घालवणारा हा वर्ग कधीच संधी निर्माण करण्याचं स्वप्न पहात नाही आणि ते वास्तवात आणण्याचं धाडसही दाखवत नाही. आत्तापर्यंत अशा कर्मदरिद्री लोकांना एक सणसणीत उत्तर देहरुपाने अस्तित्वात होतं. स्टीङ्गन हॉकिंग हे ते नाव.

त्यांच्या विकलांग शरीराची छबी आपण अनेकदा पाहिली आहे. त्यांचे विचार जाणून घेतले आहेत. बहुविकलांगतेवर मात करत, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रखर विज्ञानवादाच्या बळावर त्यांनी आपल्या परावलंबी आयुष्याला दिलेली अर्थघनताही आपण एक ना अनेक मार्गांनी पाहिली आहे. त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर, विचार जाणून घेतल्यानंतर जगण्याची नवी उर्मी अनुभवणारे काही जीव आज सकारात्मकता जपत जगत आहेत.

द्रष्टा शास्त्रज्ञ
अनेकांचं प्रेरणास्थान असणारा, नियतीने केलेल्या अन्यायावर मात करत सन्मानपूर्वक कसं जगायचं याचं मूर्तीमंत उदाहरण असणारा, सर्व आधुनिक आयामांना जगण्याच्या विविध आयामांशी एकरुप करुन आलेल्या दिवसाचं सोनं करणारा आणि आपल्या स्पष्ट विचारांनी समाजाला भानावर आणणारा एक द्रष्टा शास्त्रज्ञ अर्थात स्टीङ्गन हॉकिंग आपल्यातून निघून गेला. एका शास्त्रज्ञाचं निधन ही वरकरणी ठराविक वर्तुळात पोकळी निर्माण करणारी घटना असते. वस्तुत: शास्त्रज्ञांनी लावलेले शोध, त्यांचे विचार, त्यांची प्रयोगशीलता या सर्वांची ङ्गळं संपूर्ण समाजाच्या लाभार्थ असली तरी समाज या बुद्धिवंत, प्रज्ञावंत लोकापासून एक अंतर राखून असतो. त्यामुळेच त्यांचं निधन सर्वसामान्यांच्या आयुष्यात भावनिक आंदोलनं निर्माण करीेलच असं नाही. मात्र केवळ शास्त्रज्ञ म्हणूनच नव्हे तर एक माणूस म्हणून कसं जगावं, विकलांगतेवर मात करत, मानसिक शक्ती जपत कसं कार्यरत रहावं याचा वस्तुपाठ निर्माण केल्यामुळे स्टीङ्गन हॉकिंग यांचं निधन सर्वसामान्यांमध्येही काही तरी महत्त्वाचं हरपल्याची जाणीव निर्माण करुन देणारं आहे. म्हणूनच त्यांच्या निधनाने पृथ्वीवरील एक प्रखर इच्छाशक्ती हरपल्याची प्रबळ भावना अनुभवायला मिळत आहे.

संगणक बनला संवादाचे माध्यम
एमेरिट्स प्रोङ्गेसर असणारे हॉकिंग न्यूटन, दिरा, बॅबेज अशांसारख्या शास्त्रज्ञांच्या बरोबरीचे गणले जात असत. हॉकिंग बहुविकलांग असल्याने संगणकीय यंत्रणांखेरीज त्यांना आपलं ज्ञान व्यक्तच करता आलं नसतं. त्यांना (आणि ऊर्वरित जगालाही) सहाय्यक ठरली ती एक तंत्रप्रणाली. ती त्यांच्या आणि आपल्यामध्ये एक माध्यम म्हणून कायम राहिली. या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत पोहोचू शकले. हॉकिंग बोलू शकले (म्हणजे त्यांचे विचार आपल्याला ऐकू येऊ शकले) ते संगणकाधारित गुंतागुंतीच्या यंत्रणेद्वारे; हे बहुतेकांना माहीत असेल. ही प्रणाली त्यांना इंटेल कॉर्पोरेशनने देऊ केली होती. १९९७ पासून ते या प्रणालीचा आधार घेत जगाच्या संपर्कात रहात होते. ती चालवण्याचा, तिच्या देखभालीचा आणि ती अद्ययावत करण्याचा सर्व खर्चही शेवटपर्यंत ‘इंटेल’मार्ङ्गतच करण्यात आला. या प्रणालीचे मूलभूत घटक म्हणजे टॅब, स्क्रीनवरचा सॉफ्टवेअर की-बोर्ड आणि हॉकिंगच्या चेहर्‍याच्या अगदी किरकोळ हालचालीदेखील टिपणारा इन्ङ्ग्रारेड स्विच. या आणि इतरही आवश्यक त्या वस्तू हॉकिंग ह्यांच्या व्हीलचेअरवर आणि त्यांच्या शरीरावरही विविध ठिकाणी बसवण्यात आल्या होत्या.

चाकांच्या खुर्चीच्या हातावर टॅब बसवलेला होता. त्याला ऊर्जा मिळायची ती खुर्ची चालवणार्‍या बॅटर्‍यांकडूनच. परंतु, स्वतःच्या इंटर्नल बॅटरीवरही तो काही तास चालू शकायचा. हॉकिंग ह्यांनी वापरलेलं संगणकीय यंत्रणेशी संवाद साधण्याचं मुख्य माध्यम उर्ङ्ग इंटरङ्गेस म्हणजे वर्डस् प्लस कंपनीने लिहिलेला ईझी कीज् हा प्रोग्रॅम. आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये स्क्रीनवर दिसणारा सॉफ्टवेअर की-बोर्ड होता. एक कर्सर या स्क्रीनचे उभे-आडवे (कॉलम ऍँड रो) स्कॅनिंग करत असेे. हॉकिंग यांना जे अक्षर निवडायचं असेल त्यावर त्यांनी मान किंचित हलवली की विशिष्ट संवेदकामार्ङ्गत, कर्सर थांबवला जायचा. यासाठी त्यांच्या उजव्या गालाची हालचाल नोंदवली जायची. त्यांच्या चष्म्याच्या काडीवर बसवलेल्या इन्ङ्ग्रारेड स्विचद्वारे हे काम होत असे. इथे जगाने संगणकीय अचूकतेची कमाल पाहिली. या ईझी कीजमध्ये वर्ड प्रिडिक्शन अल्गोरिदम समाविष्ट होतं. सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्या हातातील सेलङ्गोनमध्ये असणारी ही एक प्रकारची डिक्शनरी होती. त्यामुळे शब्दाची पहिली एक-दोन अक्षरं लिहिली की पुढच्या विविध शब्दांचे पर्याय दाखवले जायचे. पूर्ण वाक्य तयार करण्यासाठी स्पीच सिंथसायझर (विश्लेषक) ची मदत घेतली जायची. हा वेगळा हार्डवेअर सिंथसायझर ‘स्पीच प्लस’ने तयार केला. ईझी कीजद्वारे हॉकिंग विंडोजच्या माउसचे नियंत्रणही करू शकायचे. त्यामुळे संपूर्ण संगणक चालवणं त्यांना शक्य होत होतं. उदा. इ-मेल चेक करणं, इंटरनेट सर्ङ्गिंग करणं हे सगळं ते करू शकत होते. इतकंच कशाला, ते स्वतःच्या भाषणाची तयारीही या माध्यमातूनच करु शकत होते.

की-बोर्ड आणि नोटपॅड वापरून मजकूर लिहिणं आणि स्पीच सिंथसायझर आणि इक्वलायझर सॉफ्टवेअर वापरून हळूहळू का होईना, त्याची आवाजी आवृत्ती तयार करणं त्यांना शक्य होत असे. शिवाय प्रत्यक्ष लेक्चर सादर करण्यापूर्वी हॉकिंग त्यात सुधारणाही करू शकत असत. २.७ गिगाहर्टझ्‌वर चालणारा इंटेल कोअर आय-सेव्हन प्रोसेसर आणि इंटेलचाच ५२० मालिकेतील १५० जीबी सॉलिड स्टेट ड्राइव्ह (वेबकॅम आणि स्काइपसोबत) या कामासाठी वापरले जात असत. याखेरीज लिनोवो थिंकपॅड एक्स २२० हा टॅब, स्पीच प्लस कंपनीने बनवलेले कॉलटेक्स्ट ५०१० या स्पीच सिंथसायझर्सचाही उपयोग केला जात असेे. यासाठीचा ऑपरेटिंग प्लॅटङ्गॉर्म होता विंडोज ७.

हॉकिंग ह्यांच्या गरजेनुसार या अत्याधुनिक तंत्रातही सुधारणा करण्याचं काम इंटेल तसंच इतर संबंधित कंपन्यांद्वारे केलं जात असे. विचार व्यक्त करण्यासाठी हॉकिंग ह्यांच्या चेहर्‍याच्या स्नायूंची हालचाल होत असल्याचं आपण आधी पाहिलंच आहे. त्या हालचालींचा अधिक कार्यक्षमतेने अर्थ लावणारी नवी सॉफ्टवेअर्स विकसित करण्यासाठी इंटेलने स्वतंत्र अभियंत्यांचीच नेमणूक केली होती. त्याचप्रमाणे हॉकिंग ह्यांच्या शारीरिक हालचालींवर अवलंबून न राहता, ब्रेन-कंट्रोल्ड इंटरङ्गेसद्वारे मेंदूतील विचारलहरींशी थेट संपर्क साधून त्यांचे मॅपिंग करण्याचेही प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे त्यांचा मेंदू वाचणं काही अंशी शक्य झालं होतं.
असं हे जगावेगळं व्यक्तिमत्त्व लाभलेले स्टीङ्गन हॉकिंग आइन्स्टाइननंतरचे सर्वश्रेष्ठ भौतिकशास्त्रज्ञ मानले गेले.

अनेक मानसन्मानांचे धनी
हॉकिंग यांनी अनेक संस्थांमध्ये विविध मानद पदं भूषवली. त्यात केंब्रिज विद्यापीठातील उपयोजित गणित व सैद्धांतिक भौतिकशास्त्र विभाग, सेंटर ङ्गॉर थिओरॅटिकल कॉस्मॉलॉजी, कॉसमॉस नॅशनल कॉस्मॉलॉजी सुपरकॉँप्यूटर, एमेरिट्स ल्यूकॅशिअन प्रोङ्गेसर आदी अगदी टॉप ङ्गाइव्ह पैकी म्हणता येतील अशी काही उदाहरणं. अपंगत्व, मग ते मानसिक असो की शारीरिक, कोणाही सजिवाला लाक्षणिक अर्थाने पांगळं करून टाकतं यात शंकाच नाही. मात्र तंत्रज्ञान, इच्छाशक्ती आणि प्रखर बुद्धिमत्ता यांचं अनोखं आणि अपवादात्मक उदाहरण असणारं स्टीङ्गन हॉगिंग यांचं जीवन सर्वांहून वेगळं होतं. सध्याच्या जमान्यात परावलंबित्व आलेल्या लोकांना मदत करायला संगणकीय नवतंत्रज्ञान पुढे सरसावलं आहे. कुशाग्र बुद्धीच्या परंतु शारीरिक मर्यादांमध्ये जखडलेल्या व्यक्तीला संगणकीय तंत्राचं सहाय्य मिळण्याचं जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे थोर संशोधक स्टीङ्गन हॉकिंग.

त्यांचं उदाहरण पुढील अनेक वर्षं घेतलं जाईल. त्यांच्या मेंदूतील विचारप्रक्रिया समजून घेणं आपल्याला शक्य झालं ते निव्वळ संगणकीय उपकरणांमुळेच. अन्यथा, त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचा लाभ आपल्याला कधीच मिळू शकला नसता! त्यांचे विचार जाणून घेता आले नसते. या माध्यमातून त्यांनी आपले विचार समाजापर्यंत पोहोचवले. पूर्णपणे संगणकीकृत प्रणालीवर बेतलेलं जीवन अवलंबलेलं असूनही आर्टिङ्गिशिअल इन्टेलिजन्सच्या ते विरुद्ध होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने काम करणार्‍या या यंत्रमानवांना जन्माला घालण्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. पुढे हेच यंत्रमानव मानवी अस्तित्वालाच धोका उत्पन्न करु शकतात असं त्यांचं मत होतं. आता त्यांच्या पश्‍चात या त्यांच्या मताचा विचार करायला हवा.

स्टीफन यांची भारतभेट
२००० साली स्टीफन हॉकिंग मुंबईत आले होते. तेव्हा त्यांच्या विकलांगत्वाचा विचार करून एका वाहन उद्योगाने त्यांच्यासाठी व्हीलचेअर वाहून नेता येईल अशी मोटार पुरवली होती. त्यातून ते त्यांचे केंब्रीजमधील मित्र डॉ. शशिकुमार चित्रे यांच्यासह मलबार हिल, मरीन ड्राइव्ह वगैरे परिसर फिरले. यावेळी त्यांच्यासोबत आणखी दोघे जण होते. चहा घेण्यासाठी मंडळी ताज हॉटेलमध्ये गेली तेव्हा डॉ. चित्रे यांच्या खिशात केवळ तीनशे रुपये होते. या पैशात एवढ्या लोकांचा चहा कसा होणार या चिंतेने डॉ. चित्रे यांनी ताजच्या व्यवस्थापकांना फोन केला. स्टीफन हॉकिंग आले आहेत हे कळताच त्यांनी त्या सर्वांच्या चहापानाचीच नव्हे, तर जेवणाची व निवासाचीही सोय केली. इतकेच नव्हे, तर ही मंडळी जेवत असताना स्वतः रतन टाटा तेथे आले आणि त्यांनी तुम्ही स्टीफन यांना येथे आणून आपला दिवस अविस्मरणीय केल्याचे उद्गार डॉ. चित्रे यांच्याकडे काढले!