अवकाळी पावसाचा वीज पुरवठ्यावर परिणाम

0
154

राज्यातील विविध भागात बुधवारी पडलेल्या पावसामुळे वीज पुरवठा काही वेळ बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. राज्यातील ढगाळ वातावरण अद्याप कायम आहे.

या अवकाळी पावसाचा काजू व इतर पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना बदललेल्या वातावरणामुळे आरोग्य समस्या भेडसावू लागली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यातील हवामान कोरडे आहे. पणजी शहर आणि आसपासच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

या पावसामुळे शहर, रायबंदर, मेरशी व आसपासच्या भागातील वीज पुरवठ्यावर विपरीत परिमाण झाला. शहर परिसरातील वीज पुरवठा तास ते दीड तासाने पूर्ववत करण्यात आला. मेरशी व आसपासच्या भागातील वीज पुरवठा पहाटेच्या वेळी पूर्ववत करण्यात आला. तर, रायबंदर परिसरातील वीज पुरवठा गुरूवारी सकाळी सुरळीत करण्यात आला, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.