अल्ट्राकॉन मडगावला बॅडमिंटन लीगचे जेतेपद

0
86

ऍपेक्स लॅडर प्रा. लिमिटेडने गोवा बॅडमिंटन संघटना व क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या पहिल्या सब ज्युनियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत अल्ट्राकॉन मडगावचा संघ विजयी ठरला. एकूण १० संघांचा समावेश असलेली सदर स्पर्धा पेडे क्रीडा संकुलातील इनडोअर सभागृहात खेळविण्यात आली.
विजेत्या संघात रुद्र दुकळे, हर्ष माने, यश देसाई, आर्यन कुमार, रजत साळुंके, सिया कोलवाळकर व काव्या राणे यांचा समावेश होता. उपविजेत्या म्हापसा शटलर्स संघात आर्यमान सराफ, रुद्र फडते, सर्वज्ञ खांडेपारकर, आशतोष ढवळीकर, मानस प्रभू, सिया काकोडकर व सान्वी अकुला हे खेळाडू होते.

म्हापसा संघाला आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर अल्ट्राकॉनने पाचही सामनेजजिंकत दोनदिवस चाललेली सदर स्पर्धा जिंकली. निर्माण संघ (यश हळणकर, माझ शेख, योहान मयेकर, वेदांत चव्हाण, झेद परेरा, अँड्रिया कलवमपारा व ऋचा भोबे) तिसर्‍या स्थानी राहिला तर फँटसी स्पिरिट्‌स (अथर्व पेडणेकर, सूरज नाईक, अभिषेक स्वामी, अर्जुन आनंद, अश्रफ आगा, अर्णव देसाई, रुहा माल्ल्या व आदिता नायक) यांनी चौथे स्थान मिळविले. अंतिम सहा संघात स्थान मिळविलेल्या ऍपेक्स लॅडर (चिराग महाले, सोहम केरकर, समर्थ कामत, वरद भोबे, तेजस सुतार, मैत्रेयी तेलंग व सौम्या देशपांडे) तसेच क्रिस्टल ट्रेडलिंक्स केटीएम (एलविटो डिसोझा, श्रेयशक कळशावकर, ब्लेस्टन डायस, एलियस फर्नांडिस, ऍड्रियन डिसोझा, सिनोविया डिसोझा व सलोनी नाईक) यांना विशेष बक्षिसे देण्यात आली.

बक्षीस वितरण समारंभाला स्पर्धेचे प्रवर्तक अखिल पर्रीकर, मांगिरीश दळवी, मनोज दुकळे, वेंकटेश शेणई, जीबीएचे सचिव संदीप हेबळे, आयोजन समितीचे सदस्य अनिकेत शेणई, शशांक देसाई, केवल सावंत, रेफ्री रॉय एथायद आदी उपस्थित होते.