अर्धफोंड चेकनाक्याजवळ अपघातात युवती ठार

0
95

मडगाव कारवार महामार्गावरील अर्धफोंड येथील वनखात्याच्या चेक नाक्याजवळ मेंगलोर येथून लाकूड घेऊन आलेल्या केए ०१ बी ७३२२ या ट्रकाने दिलेल्या जीवघेण्या धडकीमुळे बसची वाट पाहत उभी असलेल्या प्रिस्का फर्नांडिस (२४) या युवतीचा अंत झाला. प्रसंगावधान पाहून पळून गेल्यामुळे दोन युवती बचावल्या.
सदर लाकूड वाहक ट्रकाने अर्धफोंड येथील बस थांब्याला प्रथम जोरदार धडक दिली. त्या धक्क्याने बस थांबा मोडला, पोलिसांचे अडथळे मोडले आणि त्याखाली सदर युवती चिरडली गेली. युवतीला काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी तिला मृत घोषित केले. आणि शवचिकित्सेसाठी शव मडगावला पाठविण्यात आले आहे.