अयान, चेतन, रिया, अँड्रिया पुढील फेरीत

0
59

>> गोवा राज्य उपकनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धा

अयान शेख, चेतन मगदुम, जयदीप बिर्जे व डॅनियन फिलिप्स यांनी १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीतून तर रिया कांजी, अँड्रिया कलवमपारा व आकांक्षा तिवारी यांनी मुलींच्या गटातून गोवा राज्य उपकनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळविले. शटलर्स क्लबने गोवा बॅडमिंटन संघटनेच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेतील सामने कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये खेळविण्यात येत आहेत. तत्पूर्वी, शटलर्स क्लबचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

१३ वर्षांखालील मुलगे एकेरी ः अंतिम फेरी (पात्रता) ः प्रणव नाईक वि. वि. अभिनव पास्ते १५-९, १५-१, व्यास रॉड्रिगीस वि. वि. सोहम नाईक १५-९, १५-४, वरद भोबे वि. वि. सलिल देशपांडे १५-७, १६-१४, अर्जुन आनंद वि. वि. सोहम नाईक १५-५, १५-६, चिराग महाले वि. वि. सोहन बिचोलकर १५-१०, १५-८, अथर्व पेडणेकर वि. वि. नीहाल सावईकर १५-१३, १५-११, शिवम सैनी वि. वि. अथर्व देसाई १५-५, १५-८, १३ वर्षांखालील मुली एकेरी ः अंतिम फेरी (पात्रता) ः अल्फोन्सा परेरा वि. वि. अमिषा मांद्रेकर १५-३, १५-१२, आदित्य नायक वि. वि. अँगी सौझा १५-४, १५-५, रुही मल्ल्या वि. वि. दिशा दत्ता १५-९, १५-५, सौम्या लोटलीकर वि. वि. दिशा तेंडुलकर १५-८, १५-१०, १५ वर्षांखालील मुलगे एकेरी ः अंतिम फेरी (पात्रता)ः चेतम मगदुम वि. वि. आर्यन कुमार १५-१२, १५-१०, वेदांत चौहान वि. वि. समर्थ कामत १५-१२, १५-७, अयान शेख वि. वि. ऍरोन रॉड्रिगीस १५-६, १५-७, डॅनियल फिलिप्स वि. वि. ऍन्सन सौझा १५-७, १५-१०, ओम पारोडकर वि. वि. झेड परेरा १५-९, १५-९, जयदीप बिर्जे वि. वि. शाय माझ १५-९, १५-१३, रुद्र फडते वि. वि. अर्जुन आनंद १५-१३, ४-१५, १५-१३, १५ वर्षांखालील मुली एकेरी ः अंतिम फेरी (पात्रता) ः रिया कांजी वि. वि. सिया कोलवाळकर १५-१२, १५-१३, अँड्रिया कलवमपारा वि. वि. सान्वी अकुला ८-१५, १५-७, १५-८, आकांक्षा तिवारी वि. वि. ईशा कुलकर्णी १५-१२, १५-१३.