अमित नमनची घोडदौड

0
97
India's Amit (blue) fights against Ghana's Tetteh Sulemanu (red) during their men’s light fly (46-49kg) category preliminary fight during the 2018 Gold Coast Commonwealth Games at Oxenford Studios on the Gold Coast on April 6, 2018. / AFP PHOTO / ADRIAN DENNIS

भारतीय बॉक्सिंगपटू अमित फंगल (४९ किलो) व नमन तन्वर (९१ किलो) यांनी काल शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. काल या द्वयीने आपापल्या बाऊटमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर एकतर्फी विजय प्राप्त केला.

तन्वर याने दुपारच्या सत्रात तांझानियाच्या हारुना म्हांडो याला पराजित करत ‘अंतिम ८’ खेळाडूंत स्थान मिळविले तर अमितने संध्याकाळच्या सक्षात घानाच्या तातेह सुलेमानू याला हरविले. या लढतीत पंचांनी अमितच्या बाजूने ३०-२६, ३०-२६, ३०-२७, ३०-२७, ३०-२५ असा कौल दिला. तर दुसर्‍या लढतीत पंचांनी तन्वरच्या बाजूने ३०-२६, ३०-२५,३०-२६, ३०-२४, ३०-२४ असा निर्णय दिला.

तसेच मनोज कुमार याने ६९ किलो वजनी गटातील आपला शुभारंभी सामना जिंकून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणारा १९ वर्षीय तन्वर जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेचा कांस्यपदक विजेता आहे. निवड चाचणीवेळी आशियाई रौप्यपदक विजेत्या सुमीत संगवान याला नमवून त्याने राष्ट्रकुलसाठीची तिकिट मिळविले होते.

दुसरीकडे अमित हा आपले तिसरे आंतरराष्ट्रीय पदक मिळविण्यासाठी प्रयत्न करत असून इंडिया ओपन व स्ट्रँडजा ओपनमध्ये सुवर्ण यश संपादन करून त्याने भारताची मान उंचावली होती. आज सरिता देवी (महिला, ६० किलो), हुसमुद्दिन मोहम्मद (पुरुष,५६ किलो), मनोज कुमार (पुरुष, ६९ किलो) यांचे सामने होणार आहेत.