अमरनाथ यात्रा रद्द

0
186

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता यावर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्री अमरनाथ बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. अमरनाथ यात्रा २१ जुलैपासून सुरु होणार होती.
याआधी जूनमध्ये बोर्डाने बालटाल भागातून यात्रेचा मार्ग निश्चित केला होता. पण रस्ता पूर्णपणे तयार नसल्याने त्याला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर २१ जुलैपासून यात्रा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अखेर यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेसाठी याठिकाणी कोविड रुग्णालय देखील उभारण्यात आले होते. स्थानिक लोकांनी यात्रेबाबत चिंता व्यक्त केली होती. यात्रेला आलेल्या भाविकांवर येथे क्वारंटाइन होण्याची वेळ येऊ नये, असे स्थानिकांचे मत होते.