अभिनेत्री श्रीदेवी पंचत्वात विलीन

0
204

दुबईत शनिवारी अपघाती निधन झालेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत काल संध्याकाळी ५.३० वाजता शासकीय इतमामात बॉलीवूड कलाकार, चाहते यांच्या मोठ्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पती बोनी कपूरसह त्यांचे कुटुंबीय व चाहत्यांनी श्रीदेवींना साश्रूनयनांनी निरोप दिला.

मंगळवारी रात्री श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईहून खाजगी विमानाने मुंबईत आणण्यात आल्यानंतर काल सकाळी त्यांच्या निवासस्थानी ते अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. अंत्यदर्शनासाठी सकाळपासून बॉलिवूडमधील नामवंत हस्तींसह, सिने चाहते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रचंड रिघ सुरू झाली होती. अमिताभ बच्चन, ऐश्‍वर्या राय बच्चन, जया बच्चन, सलमान खान, शाहरूख खान यासह अनेक सिने कलकारांसह हजारो चाहत्यांनी श्रीदेवींचे अंतिम दर्शन घेतले.
श्रीदेवी यांचे पार्थिव विलेपार्लेतील सेवा समाज स्मशानभूमीबाहेर पोचले त्यावेळी तेथे चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती.