अपात्रता याचिका प्रश्‍नी आमदारांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

0
225

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता याचिका प्रकरणी सभापतींना नोटीस जारी केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांची बैठक घेऊन पुढील रणनीतीवर विचार विनिमय काल केला आहे.

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आमदार अपात्रता प्रकरणी याचिकेला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने गोवा विधानसभेचे सभापती व इतरांना नोटीस जारी करून तीन आठवड्यात बाजू मांडण्याची सूचना केल्याने सत्ताधारी भाजपच्या गटात खळबळ उडालेली आहे. राज्यातील आमदार अपात्रता प्रकरणी नोटीस जारी केल्यानंतर गोवा फॉरवर्डच्या दोन आमदारांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झालेली आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आयोजित केलेल्या बैठकीला कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, आंन्तानियो फर्नांडिस व भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इतर आमदारांचा समावेश होता.