अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार

0
91

>> आमदार सिल्वा यांची माहिती

 

नावेलीचे आमदार तथा मजूरमंत्री आवैर्तान फुर्तादो यांनी भाजपात प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर वेळ्‌ळीचे अपक्ष आमदार बेंजामीन सिल्वा यांनीही भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. आपण या निवडणुकीत अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी काल सांगितले.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सिल्वा यांनी वेळ्‌ळी मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपा सरकारला पाठिंबा दिला व त्यांनीही आपणास सहकार्य केले. भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक, संघ हिंदू धर्माशी बांधिलकी असलेला पक्ष असल्याचा येथील ख्रिस्ती लोकांचा समज आहे. त्यामुळे ते भाजपाला मते देणार नाहीत. आपल्या मतदारसंघातील मतदार हे बहुतांश ख्रिश्‍चन असल्याने भाजपातर्फे निवडणूक लढविल्यास ते मते देणार नाहीत. मात्र अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे राहिल्यास ते आपणाबरोबर राहतील, असेही आमदार सिल्वा यांनी सांगितले.