अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर सभा, बैठका नकोत

0
206

>> विधानसभा सचिवांची सूचना

>> अधिवेशन २७ जुलैपासून

कोरोना विषाणूच्या फैलावाच्या काळात होणार्‍या २७ जुलैपासून होणार्‍या गोवा विधानसभेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा सदस्यांनी बैठका, सभा, वार्तालाप आदींचे आयोजन करू नये, अशी सूचना विधानसभेच्या सचिव नम्रता उल्मन यांनी केली आहे.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन येत्या २७ जुलैपासून सुरू होणार असून ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. राज्यातील विविध भागात कोरोनाचा फैलाव सुरू आहे. अधिवेशनाच्या कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आमदारांना सतर्क करण्यासाठी ही सूचना जारी करण्यात आली आहे.

विधानसभेच्या कुठल्याही समितीच्या अहवालांना मान्यता देण्याचे काम सर्क्युलेशन पद्धतीने केले जाणार आहे. तसेच पावसाळी अधिवेशनासाठी खास मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार करताना सर्व संबंधितांशी चर्चा केली जाणार आहे, असेही सचिव उल्मन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आमदारांनी स्वतःहूून कोरोना
चाचणी करावी ः सभापती
आमदारांनी सावधगिरीचा उपाय म्हणून स्वतःहून कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन सभापती राजेश पाटणेकर यांनी काल केले. आमदारांना विविध कामांसाठी विविध ठिकाणी फिरावे लागते. तसेच भरपूर लोकांच्या संपर्काला तोंड द्यावे लागत असल्याने त्यांना बाधा होण्याचा अधिक धोका असतो, असेही सभापतींनी सांगितले.