अझरची त्रिशतकी बॅट भारताकडे

0
112

पुणेस्थित क्रिकेट संग्रहालय ‘ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी’ यांनी ‘डे नाईट’ कसोटीतील पहिला त्रिशतकवीर असलेल्या पाकिस्तानच्या अझर अली याची ‘ती’ ऐतिहासिक बॅट ऑनलाईन लिलावात खरेदी केली आहे. अझरने कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी २०१८ साली वेस्ट इंडीजविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये तिहेरी शतक झळकावलेली बॅट तसेच २०१७ साली भारताविरुद्धच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत परिधान केलेली जर्सी लिलावासाठी ठेवली होती.

अझरने सोशल मीडियावर बॅट आणि जर्सीसाठी प्रत्येकी १ मिलियनची किंमत ठेवली आहे आणि त्याने ते २.२ मिलियनमध्ये विकली आहेत. पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियमने १ लाख रुपयांची विजयी बोली लावून बॅट खरेदी केल्याची पाकिस्तानी फलंदाजाने पुष्टी केली. कॅलिफोर्नियामध्ये राहणारे पाकिस्तानी काश विलानी यांनी सर्वाधिक १.१ मिलियन रुपयांची बोली लावत अझरची जर्सी खरेदी केली.