अखेर मार्ली-तिर्वाळवासियांनी घातला मतदानावर बहिष्कार

0
256

संपूर्ण गोव्यातील राजकीय पक्ष, निर्वाचन आयोगाचे अधिकारी आणि काणकोणच्या शासकीय यंत्रणेचे लक्ष लागून असलेल्या काणकोण मतदार संघातील मार्ली तिर्वाळ वाडयावरील नागरीक दुपारी दोन वाजेपर्यत मतदान केंद्रावर न आल्यामुळे या केंद्रावर सर्वत्र सन्नाटा पसरला होता. या केंद्रावर नियुक्त केलेले कर्मचारी अक्षरशा मतदारांच्या प्रतिक्षेत होते. अखेर इडीसी ५ आणि बीएलओ १ अशा ६ जणांनी मतदान केल्याची नोंद या केद्रंावर नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांना दुपार पर्यंत करावी लागली. जोपर्यंत मार्ली वाडयावर रस्ता केला जात नाही तोपयर्र्त मतदान न करण्याचा निर्णय ज्या वेळी या वाडयावरील नागरीकांनी घेतला. त्यावेळी तिर्वाळ वाडयावरील नागरीकांनी देखील त्याना साथ देण्याचे ठरविले. या केंद्रावर एकूण २२१ मतदार असून त्यातील जवळ जवळ १०० मतदार तिर्वाळ येथील आहेत. मार्ली वाडयावर एकूण ३० घरे आहेत. तितकीच तिर्वाळ वाडयावर आहेत. मतदानावर बहिष्कार घालण्याचे आधीच ठरविण्यात आले होते. म्हणून या वाडयावरील युवकांनी पाटर्या आयोजित केल्या तर महिलांनी अन्य कामात झोकून दिले. पुरूष मंडळी घरातून बाहेरच पडली नाही.

या वाडयावरील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी काणकोणचे निर्वाचन अधिकारी सगुण वेळीप आणि अन्य अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन त्याना समजावण्याचा प्रयत्न केला. काणकोणचे आमदार इजिदोर फनार्ंडिस यानीही शिष्टाई केली. परंतु या वाडयावरील मतदार शेवटपर्यंत आपल्या निर्णयाशी ठाम राहिले. या प्रतिनिधीने प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी गावचे बुधवंत कुष्टा गावकर, तिर्वाळचे नागरीक प्रकाश वेळीप, म्हाबळू वेळीप, सरपंच जगदीश गावकर यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेतली. मार्ली तिर्वाळ पयर्र्तच्या रस्ता धुळीने माखलेला आहे. मार्ली येथील मुले पैंगीणच्या श्र्‌रद्धानंद विद्यालयात, काही उच्च माध्यमिक विद्यालय त्याच प्रमाणे महाविद्यालयात शिक्षण घेतात. सकाळी पाच वा. चालत तिर्वाळ पर्यंत जाताना गणवेष धुळीने माखून जातो. बूटांना धूळ लागते. त्यामुळे मुले पाण्याची बाटली बरोबर घेऊन जातात आणि तिर्वाळ येथे पोचल्याबरोबर बूट धूतात. बूट घातले नाहीत तर शाळेत शिक्षा होते. आपल्या मुलांनी काय पाप केले म्हणून हा त्रास त्यानी सोसावा असे मत कुष्टा गावकर यानी व्यक्त केले. अभयारण्याच्या जाचक नियमाचा त्रास आपण का सोसावा असे मत त्यानी व्यक्त केले.

दुपारच्या सत्रात काणकोणचे आमदार इजिदोर फर्नाडिस, जनार्दन भंडारी यानी परत एकदा वाडयावर भेट दिली. काही मतदारांशी चर्चा करून मतदानाचा पवित्र हक्क नाकारू नये असे सुनावले.