अंबातीकडे हैदराबाद संघाचे नेतृत्व

0
79

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेतलेल्या अंबाती रायुडूने दमदार पुनरागमन केले आहे. त्याच्याकडे आता हैदराबाद संघाच्या नेतृत्वाची धूरा सोपविण्यात आली आहे. आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेत तो हैदराबाद संघाचे नेतृत्व करणार आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंबातीला डावलण्यात आले होते. त्यामुळे नाराज होऊन त्याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. परंतु काही दिवसांनी त्याने आपण हा निर्णय भावनाविवश होऊन घेतल्याचे स्पष्ट करत तो मागे घेतला होता. हैदराबाद क्रिकेट असोसिएशन निवड समितीचे प्रमुख नोएल डेव्हीड आणि माजी खेळाडू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी रायुडूशी चर्चा करुन त्याला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यायला लावला होता. त्यानंतर आता त्याच्याकडे हैदराबादचं नेतृत्व सोपवल्याचं डेव्हीड यांनी स्पष्ट केले.

विजय हजारे करंडकासाठी निवडण्यात आलेला हैदराबादचा संघ पुढील प्रमाणे ः
अंबाती रायुडू (कर्णधार), बी. संदीप (उप-कर्णधार), पी. अक्षत रेड्डी, तन्मय अग्रवाल, ठाकूर वर्मा, रोहित रायुडू, सी.व्ही. मिलींद, मेहदी हसन, साकेत साई राम, मोहम्मद सिराज, मिकील जैस्वाल, जे. मल्लिकार्जुन (यष्टीरक्षक), कार्तिकेय काक, टी. रवी तेजा, आया देव गौड