५ पाक दहशतवाद्यांचा जम्मू-काश्मीरात खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात काल सुरक्षा दलांनी एका कारवाईत ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर संरक्षण खात्याचे प्रवक्ते कर्नल राकेश कालिया यांनी ही माहिती दिली. शोपियॉं जिल्ह्याच्या रेबान या भागात दहशतवादी दडून राहिल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सदर परिसराला वेढा घालून ही कारवाई केली.

या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्यानंतर जवानांनी त्याला चोख प्रत्त्युत्तर दिले.
दरम्यान पाकिस्तानी सैन्याने काल शस्त्रसंधीचा भंग करताना केरन आणि रामपूर या विभागांमधील नियंत्रण रेषेलगत भारतीय हद्दीत गोळीबार केला.

सकाळी ११ व दु. १२.४० यावेळी पाक सैनिकांनी भारतीय हद्दीत गोळीबार केल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. या प्रकारालाही भारतीय जवानांनी चोख प्रत्त्युत्तर दिले.