ब्रेकिंग न्यूज़

४.५ लाखांचे अमली पदार्थ आसगावातील छाप्यात जप्त

अमलीपदार्थ विरोधी विभागाने १० रोजी मध्यरात्री बादे आसगाव येथे छापा घालून ४.५ लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करून दोघांना अटक केली. सॅमसन चेरियन बेंसिलियस (३२, मंगळूर) आणि थॉमस बेझिल ऍबट (४४, मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४.० मिलिग्रॅम एलएसडी आणि १८० ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आला आहे. तसेच महिंद्रा स्कूटर जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी कारवाई केली.