ब्रेकिंग न्यूज़

३७ वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्य सरकारने ३७ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काल जारी करून प्रशासकीय पातळीवर मोठे बदल केले आहेत. गेली कित्येक वर्षे वित्त खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहणारे मायकल डिसोझा यांची बदली करण्यात आली असून तेथे सुनील मसूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मायकल डिसोझा यांची गृहनिर्माणच्या अतिरिक्त सचिव तसेच जीआयपीएआरडी संचालक (प्रशिक्षण) पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

खाण खात्याच्या संचालकपदी आशुतोष आपटे, माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या संचालकपदी मेघना शेटगावकर, वाहतूक खात्याच्या संचालकपदी राजन सातर्डेकर, पंचायत खात्याच्या संचालकपदी गोपाळ पार्सेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निखिल देसाई यांची व्यवस्थापकीय संचालक गोवा पर्यटन विकास महामंडळ, प्रसन्न आचार्य यांची दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी (१), अरविंद बुगडे यांची संचालक हस्तकला मंडळ , मेघनाथ परब यांची व्यवस्थापकीय संचालक गोवा राज्य एससी आणि एसटी वित्त विकास महामंडळ, आग्नेलो फर्नांडिस यांची व्यवस्थापकीय संचालक गोवा राज्य एसटी वित्त आणि विकास महामंडळ या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.

कदंब वाहतूक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नेटो यांची एआरडीच्या संयुक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजू गावस यांची वीज खात्याच्या संचालक (प्रशासन), वासुदेव शेट्ये यांच्याकडे कस्टोडियन ऑफ इव्हॅक्यू प्रॉपर्टीज व गोवा राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणाचा ताबा देण्यात आला आहे.
प्रशांत शिरोडकर यांची अतिरिक्त अबकारी आयुक्त, महेश खोर्जुवेकर यांची एसएलएओवर बदली करण्यात आली आहे.