१५ संशयित रुग्णांचा अहवाल नकारात्मक

बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात मंगळवारी ज्या १५ संशयित कोरोना रुग्णांचे नमुने तपासण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल हाती आलेला असून त्यापैकी एकालाही कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे आढळून आले असल्याचे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल सांगितले.

मंगळवारी या १५ संशयित कोरोना रुग्णांचे नमुने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७ वरच राहिल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.