ब्रेकिंग न्यूज़

१५ वा वित्त आयोग आज गोवा भेटीवर

१५ वे वित्त आयोग आज गुरुवार दि. २३ आणि उद्या शुक्रवार दि. २४ जानेवारीला गोव्याला भेट देऊन राज्य सरकार, वरिष्ठ अधिकारी आणि व्यापार, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांच्यासमवेत आयोगाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी येणार आहेत. वित्त आयोग मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मंत्री, आमदार तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. राज्यातील नगरपालिका, ग्रामीण भागातील पंचायती आणि उद्योग व व्यापार क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी चर्चा करणार आहे. आयोगाने प्रिन्सीपल अकाअंट जनरल ऑफ गोवा यांच्याकडून राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे.