॥ पंचकर्म विचार ॥ अनुवासन बस्ति (स्नेहिक बस्ति)

  • वैदू भरत म. नाईक
    (कोलगाव)

बस्ति दिल्यानंतर सुमारे १० मिनिटे रुग्णाने उताण्या स्थितीत पडून रहावे. यावेळी बस्तिपीठाची कमरेपासून खालची बाजू ४०अंशाने वर न्यावी. जेणे करून स्नेहाचा प्रभाव सर्व शरीरावर पसरतो. यासाठी पाठीला तशी यंत्रणा असावी.

व्याख्या ः ज्या बस्तिमध्ये बस्तिद्रव्य म्हणून केवळ सिद्ध स्नेहाचाच उपयोग केला जातो त्यास ‘अनुवासन बस्ति’ असे म्हणतात.
अनुवासन हा स्नेहबस्तिचाच एक प्रकार मानला आहे. सुश्रुतांनी या बस्तिस स्नेहिक बस्ति असे पर्यायी नाव दिले आहे.

उपयोगिता – जो बस्ति शरिरात राहूनही (अनुवसन्‌अपि) दुष्टि उत्पन्न करित नाही त्याला अनुवासन बस्ति असे म्हणतात. म्हणजेच या बस्तिचा दरवेळी लगेचच प्रत्यागम व्हावा अशी अपेक्षा नसते. साहजिकच शोधनापेक्षा शमन, तर्पण, बृहृण, स्नेह अशा कर्मांसाठी या बस्तिचा उपयोग केला जातो.

याखेरीज ज्यांना निरुह बस्ति चिकित्सा द्यावयाची आहे. त्यांना प्रथम अनुवासन बस्ति दिली जाते. म्हणजेच बस्तिचे अनुवासन बस्ति हे पुर्वकर्म आहे.
जे रुग्ण अत्यंत रुक्ष शरीराचे असतात; आणि ज्यांचा अग्नि अत्यंत प्रज्वलित असतो त्यांना अनुवासन बस्ति दिली जाते.
ज्या रुग्णांना केवळ वातव्याधी झालेल्या आहेत; त्यांना अनुवासन बस्ति दिली जाते.
अननुवास्यामध्ये अनुवासन दिल्यास शरीमध्ये अंगसात हे लक्षण प्रामुख्याने निर्माण होते.

ज्या रोग्यांना अर्जीवा, उन्माद, तृष्णा, शोक, मुर्च्छा, अरुचि, भय, श्‍वास, कास व क्षय झाला असेल त्यांना अनुवासन व आस्थापन हे दोन्हीही बस्ति देऊ नयेत.
काल – ऋतुनुसार हेमंत, शिशिर, वसंत या ऋतुंमध्ये सकाळी भोजनानंतर अनुवादन बस्ति घेणे चांगले.
अनुवासन बस्ति हा कधीही भोजनापूर्वी देऊ नये. तसे केल्यास तो आतड्यांत फार वरपर्यंत जाण्याची शक्यता असते. भोजनानंतर लगेच अनुवासन बस्ति द्यावा.
मात्रा विचार – अनुवासन बस्तिमधील स्नेहद्रव्याची मात्रा ठरविताना रुग्णाच्या व्याधी, अग्निचे बल व प्रामुख्याने वयाचा विचार केला जातो. संक्षेपतः अनुवासन द्रव्याची मात्रा ही आस्थापनामध्ये वापरल्या जाणार्‍या एकूण द्रव्याच्या १/४ इतकी असते. सोबतच्या अनुवासन द्रव्याची वयानुसार मात्रा दिली आहे.

अनुपान – सैंधव व बडिशेप जरुरीप्रमाणे
वैद्यसिद्धता – वैद्याने आपले हात स्वच्छ आणि निर्जंतुक करावेत. ट्रीटमेंट गाऊन परिधान करावा. हातामध्ये रबरी निर्जंतुक हातमोजे चढवावेत.
उपकरण – यंत्रासिद्धता
(१) बस्तिपीठ – ७ फूट लांब, ३ फूट रुंद, २२॥ फूट उंच असे धातुचे किंवा लाकडी टेबल तयार करावे.
अनुवासन बस्ति वयानुसार
————–
वय वर्षे

द्रव्याचे प्रमाणे मिली
१२
२४
३६
४८
६०
वय वर्षे
१०
द्रव्याचे प्रमाण मिली
७२
८४
९६
१०८
१२०
वय वर्षे
१६
१७
१८
१९ ते ७०
७१ ते ८०
द्रव्याचे प्रमाण मिली
२४०
२६४
२८८
२८८
२४०
———————-
या टेबलाची पायाकडील बाजू ४० ने उंच होऊन शकेल अशी व्यवस्था करावी.
(२) मध्यभागी ४’’ व्यासाचे गोलाकार छिद्र असलेल्या लाकडी स्वच्छ व निजर्जुक टॉवेल.
(३) प्लॅस्टिक किंवा काचेची १०० सी.सी.ची सिरिंज
(४) सिंपल रबर कॅथेटर – नवा, निजर्तुंक
(५) व्हायब्रेटर (६) स्टीलची पातेली (७) ट्रीटमेंट गाऊन (८) रबरी हातमोजे (९) जवळ स्वच्छतागृहाची सोय (१०) मोजपात्र
औषधे ः (१) सुयोग्य बस्तिद्रव्य (२) गरमपाणी (बस्तिद्रव्य पातळ व सुखोष्ण करण्यासाठी) (३) रबरी नलिका व गुदभाग यांचे स्नेहनार्थ निंब तैल वकरंज तैल (४) सैंधव (५) बडीशेप चुर्ण
सिद्ध स्नेहाची बस्ति देताना त्यामध्ये पुरेसे सैंधव व बडीशेप चुर्ण मिसळावे. स्नेह द्रव्य प्रत्यक्ष अग्नीवर ठेवून गरम न करता गरम पाण्यात अप्रत्यक्षपणे गरम करून सुखोेष्ण करूनच बस्ति द्यावी.
रुग्णपरिक्षा – सर्वप्रथम रुग्णाचे परिक्षण करून तो रुग्ण अनुवासनार्ह आहे. याची निश्‍चिती करावी.
कोणताही बस्ती देण्यापूर्वी गुदपरिक्षण करणे महत्वाचे आहे. यामुळे गुदाचे ठिकाणी असलेल्या व्रण, अर्श, भ्रंश आदि व्याधींची माहिती वैद्याला मिळते व त्यानुसार बस्तिमध्ये योग्य तो फरक करता येतो.

स्नेहन व स्वेदन – अनुवासन बस्ति देण्यापूर्वी सुयोग्य तैलाने सर्वागास अभ्यंग व संवाहन करावे. त्यानंतर स्वेदनासाठी सर्वांग बाष्पस्वेद, तापस्वेद अथवा कटीच्या अधोभागी नाडीस्वेदाची योजना करावी. सोपाप्रकार म्हणजे अवगाह स्वेदनाची योजना करावी. यासाठी एक मोठ्या गंगाळयामध्ये वा टबमध्ये सुखोष्णजल ठेवून रुग्णास त्यामध्ये काही काळपर्यंत बसवावे.
भोजन – यानंतर रुग्णास फार स्निग्घ नाही वा फार रुक्ष नाही असा आहार घेण्यास सांगावे, आहारामध्ये मांसरस, दूध, तांदळाची खीर, भात, ताजी भाकरी, गोड ताक, तूप यापैकी उपलब्ध अन्नपदार्थांचा समावेश असावा. आहारामध्ये प्रमाण मात्रा नेहमीच्या आहारापेक्षा १/४ इतके कमी असावे.

चक्रमण – भोजनानंतर रुग्णांस सुमारे ५ मिनिटे शतपावली करावयास सांगावी.
मलमूत्र विसर्जन – रुग्णास पुन्हा एकदा मलमुत्र विसर्जन करावयास सांगावे. गुदभागाची नीट स्वच्छता करावयास सांगावी.
भोजनानंतर बस्ति देण्यामध्ये फार वेळ जाऊ देऊ नये.
प्रधान कर्म –
रुग्णस्थिती – रुग्णाचे कंबरेखाली सर्व कपडे काढावयास सांगून त्याला वाम-पार्श्‍व स्थितिमध्ये डावा हात डोक्याखाली घेऊन डावा पाय सरळ ठेवण्यास सांगावा. उजवापाय गुडघ्यात दुमडून तो पोटाशी घेण्यास सांगावे. मध्यभागी गोलाकार छिद्र असलेले स्वच्छ निर्जंतुक कापडी टॉवेल रुग्णाच्या नितंब प्रदेशावर पांघरावा. हे छिद्र नेमके गुदभागावर येईल हे पहावे.
रुग्णाच्या गुदभागी व रबरी नलिकेस स्नेह लावून रबरी नलिका सुमारे ४ ते १० इंचपर्यंत आत खोलवर न्यावी. बस्ति देताना तो सुखोष्ण असावा. त्यानंतर रुग्णाच्या स्फिक् प्रदेशी व्हायब्रेटरने ताडन करावे. यामध्ये बस्तिद्वारा दिलेले बस्तिद्रव्य शरीरामध्ये अधिक वेळ राहाते.

बस्ति दिल्यानंतर सुमारे १० मिनिटे रुग्णाने उताण्या स्थितीत पडून रहावे. यावेळी बस्तिपीठाची कमरेपासून खालची बाजू ४०अंशाने वर न्यावी. जेणे करून स्नेहाचा प्रभाव सर्व शरीरावर पसरतो. यासाठी पाठीला तशी यंत्रणा असावी.
पश्‍चात कर्म – अनुवासन बस्ति दिल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णाचे स्नेहन- स्वेदन व स्नान करावे.

(१) बस्ति प्रत्यागम – स्नेह बस्तिचा प्रत्यागम काळ हा बारा तासांचा मानला गेलेला आहे. तत्पूर्वी स्नेह बाहेर आल्यास पुन्हा एकदा स्नेहबस्ति द्यावी. मात्र २४ तासापर्यंत स्नेहद्रव्य बाहेर न आल्यास तीक्ष्ण स्नेहबस्ति द्यावा. त्याचा अपेक्षित फायदा न झाल्यास त्याची उपेक्षा करावी.
(२) भोजन – बस्ति प्रत्यागम योग्य पद्धतीने झाल्यास दुसरे दिवशी दुपारी योग्य भोजन द्यावे. दुसर्‍या दिवशी सायंकाळी भोजनांमध्ये यूषाची योजना करावी व पुन्हा पुढचा अनुवादन बस्ति द्यावा. जर वेळेवर किंवा योग् मात्रेस स्नेहद्रव्य बाहेर आले नाहीतर रुग्णापूर्व विश्रांती द्यावी दुसर्‍या दिवशी धने व सुंठ सिद्ध गरम पाणी रुग्णास पिण्यास द्यावे, याने प्रकुपित झालेले वात व कफाचे शमन होते.
सम्यक् योग् – (१) झोप चांगली लागते (२) बलप्राप्त होते (३) शरीरास लाधव होते (४) मल, मूत्र व वायू यांची सम्यक् प्रकृती होते (५) रक्तादि धातू, बुद्धी, इंद्रिय यांचे पोषण होते (६) स्नेह बाहेर येताना कोणतेही उपद्रव होत नाहीत (७) स्नेह हा यथोचित कालामध्ये मलाबरोबरच बाहेर येतो.
अतियोग लक्षणे – (१) हल्लास (२) मोह (३) क्लम (४) अंगसाद (५) मुर्च्छा (६) गुदप्रदेशीन कर्तनवत् पीडा
अनुवासन बस्तिच्या व्यापदांमध्ये दोषानुसार चिकित्सा करावी.