हेदोडे-सत्तरीत तरुण बुडाला

 

हेदोडे सत्तरीतील वाळवंटी नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या दीपक विठो खरवत (२३) या कोपार्डे धनगरवाडा येथ राहणार्‍या तरुणाचा काल बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास बुडून मृत्यू झाला. काल संध्याकाळी तो आणि त्यांची भांवडे आंघोळीसाठी हेदोडेतील वाळवंटी नदीवर पुलापासून थोड्या दूर अंतरावर आंघोळीसाठी गेले होते. त्याठिकाणी पाण्याची पातळी खोल होती. आंघोळ करता करता दीपक हा खोलवर पाण्यात गेला व बुडाला.

या घटनेची माहिती वाळपई पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दलाच्या जवानानी मृतदेह बाहेर काढला तर वाळपई पोलिसांनी पंचनामा केला.