ब्रेकिंग न्यूज़
हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव

हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव

>> अंडर-२० जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत मिळविले सुवर्ण पदक

ऐतिहासिक कामगिरी केलेल्या भारताच्या १८ वर्षीय युवा हिमा दासने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक महासंघाने टेेंफेरे फिनलंड येथे आयोजित केलेल्या २० वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात अंतिम फेरी जिंकून हिमाने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीसह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, अनेक दिग्गज खेळाडू आणि महनीय व्यक्तींने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी हिमाचे यश हे भारताच्या युवा खेळाडूंसाठी प्रेरणा ठरणार असल्याचे म्हटले आहे. जागतिक स्पर्धेत २० वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. आसामच्या या १८ वर्षीय मुलीने ५१.४६ अशी वेळ देत ही ऐतिहासिक कामगिरी नोंदविली.