स्पर्धात्मक परीक्षा ः काळाची गरज

स्पर्धात्मक परीक्षा ः काळाची गरज

  •  नागेश एस. सरदेसाई

आयुष्यात शिक्षणाच्या काळातील महत्त्वाचे टप्पे म्हणजे १०वी व १२वी. १२वीनंतर कोणत्या प्रवाहात प्रवेश घ्यायचा आणि त्यासाठी कोणत्या अभिक्षमतात्मक परीक्षा द्याव्या, यासाठी सर्वच विद्यार्थी सज्ज झाले असणार. पण १०वी नंतर असणार्‍या सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षांबद्दल फार थोड्या लोकांना माहिती आहे, असे दिसून येते. त्यासाठीच हा लेखन प्रपंच.

‘द नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (एनटीएसई)’- ही परीक्षा माध्यमिक शाळा स्तरावरच्या परीक्षांमधील सर्वांत प्रतिष्ठेची परीक्षा समजली जाते. ही परीक्षा दर वर्षी घेण्यात येते आणि तिचा उद्देश सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून सर्वांत हुशार, दैवी देणगी लाभलेल्या ज्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, गणित, इतिहास-भूगोल आणि विश्लेषणात्मक कारणे या विषयांची विशेष अभिक्षमता असते, अशा विद्यार्थ्यांना हुडकून काढून उजेडात आणणे हा आहे. या परीक्षेचा सर्वांत मुख्य भाग हा असतो की यामध्ये तुमची गुणांची टक्केवारी पाहिली जात नाही तर गुणवत्ता यादीमध्ये उतरत्या क्रमात तुमचे नाव कुठे आहे, ते महत्त्वाचे मानले जाते. म्हणजेच या परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त गुण हे दिलेल्या वेळात जास्तीत जास्त प्रश्‍न सोडवून मिळवणे गरजेचे असते. याचा थेट संबंध तुमच्यामधील आकलन शक्ती आणि तार्किक क्षमतेशी आहे. या परीक्षेची सर्वांत चांगली गोष्ट ही आहे की ती शाळेच्या यशस्वितेचा आलेख दाखवते. एनटीएसई परीक्षेसाठी जितके जास्त विद्यार्थी शाळेतून निवडले जातील, तितकी जास्त त्या शाळेची अध्यापन क्षमता आहे असे समजले जाते. म्हणूनच ही परीक्षा म्हणजे शाळेची अध्यापन क्षमता उत्तम असल्याचे चिन्ह आहे. या परीक्षेला १०वीचे विद्यार्थी बसतात. परीक्षा राज्य पातळीवरील असो अथवा राष्ट्रीय, प्रश्‍नांचा दर्जा किंवा आकडेवारीदृष्ट्या प्रश्‍नांमध्ये बराच बदल झालेला दिसून येतो. परंतु अजूनही परीक्षेचा भर हा सूक्ष्म, विश्लेषणात्मक आणि तार्किक आधारावरील प्रश्‍नांवर असलेला दिसून येतो.

सर्वांत महत्त्वाचे यशाचे मोजमाप, जे शाळेत शिकवले जात नाही ते म्हणजे मेंटल ऍप्टिट्यूड टेस्ट (एमएटी). तसेच गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, समाज शास्त्र, इतिहास, जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांवर विचारलेले प्रश्‍न हे उच्च पातळीवरचे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयांचे खोल ज्ञान असणे गरजेचे असते, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त गुण मिळून त्यांचे नाव गुणवत्ता यादीत घेण्यासाठी विचारात घेतले जाईल. विचारण्यात येणारे सगळे प्रश्‍न हे वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) प्रकारचे आणि मल्टिपल चॉइस क्वशन्स (एमसीक्यू)- अनेक पर्यायी प्रश्‍न असतात. तसेच या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नसते. या प्रतिष्ठेच्या परीक्षेला किती विद्यार्थी बसतात त्यांच्यामध्ये चमकून दिसण्यासाठी विद्यार्थ्यांचा अचूकपणा आणि ज्ञानाची गरज असते.

या परीक्षेच्या अभ्याक्रमामध्ये ९वी आणि १०वीचे सीबीएसई (एनसीईआरटी) अभ्यासक्रमाचा समावेश असतो जो केंद्रिय विद्यालयांमध्ये, जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये, गोवा बोर्ड आणि आयसीएसई बोर्डच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा असतो व त्यानुसार परीक्षेची तयारी करायची असते. जे एनटीएसईची परीक्षा यशस्वीपणे पार करतात त्या विद्यार्थ्यांसाठी एकूण २००० शिष्यवृत्त्या दिल्या जातात आणि त्यात काही संख्या ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित केलेली असते, ज्याचे मोजमाप ९वी व १०वीच्या वर्गात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून घेतले जाते.

शिष्यवृत्तीची रक्कम ही सरकारने ठरवलेली असते जी काही कालावधीनंतर पुन्हा नव्याने बदलली जाते आणि ती ११वी पासून पुढील शैक्षणिक वर्षात सगळ्या विद्यार्थ्यांना (मग त्यांची श्रेणी किंवा कोर्स कोणताही असो) दिली जाते, फक्त पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दिली जात नाही, ज्यांना युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने ठरवल्यानुसार देण्यात येते.

ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते.
१) राज्य स्तरीय – प्राथमिक परीक्षा ही प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यात घेतली जाते ज्यामध्ये दोन प्रश्‍नपत्रिकांचा समावेश असतो- जसे मेंटल ऍबिलिटी टेस्ट (बौद्धिक क्षमता परीक्षा) आणि स्कोलॅस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट (तार्किक अभिक्षमता परीक्षा) जी प्रत्येकी १०० गुणांची असते. गुणवत्ता यादीमध्ये सर्वोत्कृष्ट २५ विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाते. त्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसाठी दुसरी एक यादी कुठल्यातरी ठराविक कसोटीनुसार तयार केली जाते. राज्यस्तरीय परीक्षा ही गोवा स्टेट काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च आणि ट्रेनिंग, पर्वरी, गोवातर्फे घेण्यात येते, जी ८वी ते १०वीसाठी स्पर्धात्मक परीक्षांच्या स्तरावरील अव्वल दर्जाची संस्था आहे. अधिक माहितीसाठी ईमेल करा – ीलशीींसेरऽीशवळषषारळश्र.लेा
२) राट्रीय स्तर – जे विद्यार्थी राज्य स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण करतात, त्या विद्यार्थ्यांकरिता ही परीक्षा घेण्यात येते. ही मे किंवा जून महिन्यात घेण्यात येते जो निर्णय एनसीईआरटी, नवी दिल्लीतर्फे घेण्यात येतो आणि ती सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन-नवी दिल्ली)तर्फे घेण्यात येते. सर्वोत्कृष्ट २६०० विद्यार्थ्यांची निवड, त्यांना एनटीएस स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) देण्यासाठी, त्यांच्या गुणवत्तेनुसार केली जाते. या परीक्षांचा मुख्य उद्देश हा भविष्यातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे व पुरस्कारित करणे हा आहे. २००९ मधले केमिस्ट्री विषयात नोबेल पारितोषिक मिळवलेले, जन्माने भारतीय असलेले रचनात्मक जीवशास्त्रज्ञ, डॉ. वेंकटरमण रामकृष्णन् हे एनटीएसई-प्राप्त वैज्ञानिक आहे.

गोव्यामध्ये, गोवा एससीईआरटीतर्फे १० दिवसांचा मार्गदर्शक कार्यक्रम १०वीच्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येतो, ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मुख्य विभागातील पहिला राज्यस्तरीय टप्पा एप्रिल/मे महिन्यात पार केलेला असतो. हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश- विषयातील उत्तम जाणकारांना आणून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास जागवणे हा असतो ज्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा (२ रा टप्पा) त्यांच्यातील उत्कृष्ट क्षमतांचा उपयोग करून उत्तमरीत्या प्रश्‍न सोडवावेत. १०व्या वर्गात शिकणार्‍या आपल्या विद्यार्थ्यांनी परिणामकारकरीत्या तयारी करावी आणि नॅशनल स्कॉलर्स बनावे.
१२वी सायन्सच्या विद्यार्थी केव्हीपीवाय – किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजने अंतर्गत घेतली जाणारी परीक्षा देऊ शकतात जी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे घेतली जाते. यामध्ये अभ्यासक्रम हा ११वी व १२वीच्या सीबीएसई (एनसीईआरटी)च्या अभ्यासक्रमातील फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी आणि मॅथेमॅटिक्स हे विषय असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना भविष्यात संशोधन आणि प्रगती करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारतर्फे ही परीक्षा घेण्यात येते. हेच उद्दिष्ट समोर ठेवून, राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो जसे आयआयएसईआर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च) ज्या भारताच्या निरनिराळ्या भागात सात ठिकाणी आहेत आणि ही केव्हीपीवाय परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी – त्यांचा इंटिग्रेटेड कोर्स एम.एस. (मास्टर ऑफ सायन्स) करू शकतात. त्यांना त्यांचे शिक्षण योग्यरीत्या व्हावे म्हणून शिष्यवृत्तीही देण्यात येते. जे विद्यार्थी प्युअर किंवा अप्लाईड सायन्स रिसर्च करू इच्छितात त्यांनी ही परीक्षा जरूर द्यावी आणि योग्य निष्ठेने आणि निर्धारपूर्वक तयारी करून उत्तीर्ण करावी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण संशोधनाची अपेक्षा बाळगावी. नवीन ऍप्स लॉंच करणेसुद्धा शक्य आहे.
द जॉईंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई) – मेन एक्झाम – जी इंजिनिअरिंगमध्ये निरनिराळ्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता द्यावी लागते, त्यामध्ये या वर्षी म्ङणजे २०१९ मध्ये दोन संधी देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने त्यांना ही संधी देण्यात आली होती. या वर्षी जानेवारी आणि एप्रिलमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती ज्यामधून फक्त १% विद्यार्थ्यांनी ती उत्तीर्ण केली पुढील जेईई-ऍडव्हान्स परीक्षेकरता जी मे २०१९ मध्ये घेण्यात येते. या व्यवस्थेमुळे आता विद्यार्थ्यांना एक तर महिन्याची निवड करता येईल किंवा जर चांगले गुण मिळाले नाहीत तर पुन्हा परीक्षा देता येईल. २०२०पासून पुढे बहुदा नवीन स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे या परीक्षा घेण्यात येतील. ज्यामध्ये एक ठरावीक स्टँडर्डायझेशन तंत्राचा वापर केला जाईल. याच धर्तीवर २०२० सालापासून बहुधा नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (एनईईटी) घेण्यात येण्याची अपेक्षा आहे जी खालील कोर्सेससाठी द्यावी लागते – मेडिसीन/डेन्टिस्ट्री/होमिओपॅथी/आयुर्वेद/नर्सिंग आणि इतर अलाईड हेल्थ कोर्सेस जसे फिजिओथेरपी कोर्स, ऑप्टोमेट्री कोर्स, मेडिकल इमेज टेक्नॉलॉजी एमआयटी) कोर्स इत्यादी. उच्च शिक्षणासाठी पुढच्या वर्षीपासून ग्रॅज्युएट फार्मसी ऍप्टिट्यूड टेस्ट आणि कॉमन ऍडमिशन फॉर मॅनेजमेंट टेस्ट सुद्धा घेतल्या जातील अशी अपेक्षा आहे.

विद्यार्थ्यांना हे माहीत असले पाहिजे की ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ ही नवीन स्थापन केलेली समिती आहे जी वरील सर्व व्यावसायिक कोर्सेसकरिता स्पर्धात्मक परीक्षा घेण्यासाठी मदत करेल. परीक्षा या संगणकावर आधारित राहतील आणि त्या वेगवेगळ्या अनेक तारखांवर घेण्यात येतील ज्यामुळे उमेदवारांना त्यांच्या हिताची तारीख आणि केंद्राची निवड करता येईल. प्रवेशाकरिता समान गुणांचा उपयोग करता येईल. म्हणूनच गोव्यातील विद्यार्थ्यांनी एका गोष्टीची नोंद घ्यावी की भारतातील व्यावसायिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्याकरिता २०२० पासून, एनटीए- नॅशनल लेव्हल बॉडीतर्फे परीक्षा घेण्यात येऊ शकते.

इतर विविध कोर्सेसकरिता, जिथे ऍप्टिट्यूड टेस्ट, लॉ करिता म्हणजे कॉमन लॉ एन्ट्रन्स टेस्ट (सीएलईटी) घेतली जाते जी राष्ट्रीय पातळीवरील कायद्याच्या उत्कृष्ट संस्थांमध्ये (नॅशनल लॉ स्कूल्स) किंवा इतर कायद्याच्या संस्थामध्ये प्रवेश मिळवून देते. तसेच हॉटेल मॅनेजमेंट जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे घेतली जाते व जी प्रतिष्ठित २६ संस्था, ज्या देशभरात पसरलेल्या आहेत, त्यात प्रवेश मिळवून देते व ती टुरीझम अँड कल्चर मिनिस्ट्री, भारत सरकारच्या अखत्यारित येते व ती पूर्वपदवी पातळीवरील कोर्सेसमध्ये प्रवेश मिळवून देते.

राज्य पातळीवर आपल्याकडे ऍप्टिट्यूड टेस्ट आहे जी १०+२ त्या स्तरावरची आहे जी गोवा कॉलेज ऑफ आर्ट- फाईन आर्ट्‌स (पेंटिंग आणि अप्लाईड आर्ट), गोवा कॉलेज ऑफ होमसायन्स- बी.एससी. होमसायन्स, विविध संस्था बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बीबीए) ही यु-जीएटीतर्फे घेतली जाते. तसेच पत्रकारिता, मास कम्युनिकेशन कोर्सेसही आहेत. अशा कोणत्याही कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न आणि बुद्धीचा जास्तीत जास्त उपयोग करून काहीतरी नवीन आणि उत्कृष्ट द्यावे, ज्यामुळे पुढे त्यांना व्यवसाय करणे सोपे जाईल.

दुसर्‍या टोकाला जेथे विद्यार्थ्यांना साधारणपणे कमी गुण मिळाले आहेत, त्यांनी स्कील डेव्हलपमेंट कोर्सेस – पॉलिटेक्निक, इंडस्ट्रियल ट्रेनिंग करावेत, जे पुढे त्यांना नोकरी मिळवून देतील व ती आजची गरज आहे. शेवटी सगळ्यात चांगली इंडस्ट्री ही शैक्षणिक इंडस्ट्री आहे.